चंद्रपूर : चंद्र आणि ग्रहांच्या युती वर्षातून अनेक होतात. परंतु, चंद्रकोर आणि शुक्र अशी ही दुर्मिळ युती शुक्रवार २३ मार्च रोजी आकाशात रात्री बघायला मिळत आहे. येथील खगोल अभ्यासक सुरेश चोपणे यांनी ही युती अतिशय दुर्मिळ असल्याचे सांगताना खगोल अभ्यासक तथा प्रेमींनी आकाशात ही अनोखी युती बघावी, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा – “देशात हुकूमशाहीची अधिकृत सुरुवात”, खासदार धानोरकर यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “पराभवाची भीती..”

banana in 15 thousand hectares of garden dried up in Jalgaon and solapur due to summer heat
उन्हाच्या झळांचा केळीला फटका; जळगाव, सोलापुरात १५ हजार हेक्टरवर बागा सुकल्या
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन

हेही वाचा – ‘समृद्धी’वर माशांचा खच! मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड

ही युती अतिशय दुर्मिळ असून एखाद्या दशकातच असा योग येत असल्याचे जाणकारांचे मत आहे. मागिल ८ वर्षांपूर्वी ‘स्माईली’ दिसली होती. त्यापूर्वी चंद्रकोरच्या वरती शुक्र दिसला होता. आज शुक्र चंद्रकोरच्या खाली दिसत आहे, असे मनोहर दृश्य दुर्मिळ असल्याने खगोलप्रेमींनी अवश्य पाहावे, असेही त्यांनी म्हटले आहे. या अनोख्या युतीचे छायाचित्र येथील छायाचित्रकार देवानंद साखरकर यांनी टिपले आहे.