आकाशात विलोभनीय चंद्रकोर आणि शुक्राची दुर्मिळ युती

चंद्रकोर आणि शुक्र अशी ही दुर्मिळ युती शुक्रवार २३ मार्च रोजी आकाशात रात्री बघायला मिळत आहे. चंद्रपूर येथील खगोल अभ्यासक सुरेश चोपणे यांनी ही युती अतिशय दुर्मिळ असल्याचे सांगितले.

conjunction of crescent moon and Venus
आकाशात विलोभनीय चंद्रकोर आणि शुक्राची दुर्मिळ युती (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

चंद्रपूर : चंद्र आणि ग्रहांच्या युती वर्षातून अनेक होतात. परंतु, चंद्रकोर आणि शुक्र अशी ही दुर्मिळ युती शुक्रवार २३ मार्च रोजी आकाशात रात्री बघायला मिळत आहे. येथील खगोल अभ्यासक सुरेश चोपणे यांनी ही युती अतिशय दुर्मिळ असल्याचे सांगताना खगोल अभ्यासक तथा प्रेमींनी आकाशात ही अनोखी युती बघावी, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा – “देशात हुकूमशाहीची अधिकृत सुरुवात”, खासदार धानोरकर यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “पराभवाची भीती..”

हेही वाचा – ‘समृद्धी’वर माशांचा खच! मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड

ही युती अतिशय दुर्मिळ असून एखाद्या दशकातच असा योग येत असल्याचे जाणकारांचे मत आहे. मागिल ८ वर्षांपूर्वी ‘स्माईली’ दिसली होती. त्यापूर्वी चंद्रकोरच्या वरती शुक्र दिसला होता. आज शुक्र चंद्रकोरच्या खाली दिसत आहे, असे मनोहर दृश्य दुर्मिळ असल्याने खगोलप्रेमींनी अवश्य पाहावे, असेही त्यांनी म्हटले आहे. या अनोख्या युतीचे छायाचित्र येथील छायाचित्रकार देवानंद साखरकर यांनी टिपले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 22:12 IST
Next Story
‘समृद्धी’वर माशांचा खच! मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड
Exit mobile version