नागपूर : महापालिकेचे सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांच्या मुलाचा घरात संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. शिवदास भेंडे (७०), हरीश भेंडे (३९, रा. गुलमोहरनगर) अशी मृत बापलेकांची नावे आहेत. शिवदास यांचा मृतदेह विवस्त्र आढळल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिवदास भेंडे हे महापालिका कार्यालयात निरीक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांना चार मुले आहेत. त्यापैकी एक आठ वर्षांपासून बेपत्ता आहे. दुसऱ्याचा मृत्यू झाला तर तिसरा मुलगा कापसीला राहतो. हरीश कुठलाच कामधंदा करीत नव्हता. त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याचे लग्नही जुळत नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापलेक दोघेही दारू प्यायचे. आज सकाळी शेजाऱ्यांना भेंडे यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्यांनी शिवदास यांचा कापसीला राहणारा मुलगा रोशन भेंडे याला माहिती दिली. रोशन घरी पोहोचला व त्याने घर उघडून बघितले असता हरीशचा मृतदेह सोफ्यावर बसलेल्या स्थितीत तर वडील शिवदास हे बाथरुममध्ये विवस्त्र पडून होते. शरीर कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. कळमना पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन, सहायक निरीक्षक दंडवते यांच्यासह पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठविले. पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण पुढे येईल.

Lal krishna Advani Death Viral News
Fact check: लालकृष्ण अडवाणींच्या निधनाची पोस्ट व्हायरल; भाजपा नेत्यांनीही आधी वाहिली श्रद्धांजली मग कळलं सत्य
Settlement outside Bholebaba Ashram Inspection of the incident site by Chief Minister
‘भोलेबाबा’च्या आश्रमाबाहेर बंदोबस्त; मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी
girlfriend genitals cut news
धक्कादायक! ऐनवेळी लग्नास नकार दिल्याने महिलेचं क्रूर कृत्य, प्रियकराचे गुप्तांग कापून…
Ulhasnagar Municipal Corporation, Issues Show Cause Notices Over Attendance Fraud, Employees attendence fraud in Ulhasnagar Municipal Corporation, ulhasnagar news, marathi news, Ulhasnagar Municipal Corporation Issues Notices to employees, Sanitation workers,
उल्हासनगर पालिकेत ‘डमी’ कर्मचारी
suicide in goregao
मुंबईत पीएचडीधारकाचा मैत्रिणीच्या घरी संशयास्पद मृत्यू; पंख्याला लटकलेल्या मृतदेहावर रक्तस्राव कसा झाला?
thane, Stray Dog Found Suspicious Dead in thane, Case Filed After Stray Dog Found Dead, Animal Lovers Suspect Poisoning or Beating dog in thane, dog suspicious dead in thane, thane news, animal lovers,
भटक्या श्वानाचा संशयास्पद मृत्यू, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Assam Home Secretary Shiladitya Chetia commits suicide after wife death
पत्नीच्या मृत्यूनंतर आसामच्या गृहसचिवांची आत्महत्या
wife, expenses, High Court,
अंथरुणाला खिळलेल्या पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल! अनिवासी भारतीयाला उच्च न्यायालयाचे आदेश

हेही वाचा >>>“कृषिमंत्र्यांना लाल आणि हिरव्या मिर्चीतील फरक तरी कळतो का?” यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका; म्हणाल्या…

आत्महत्या की घातपात?

हरीशचे वडिलांसोबत पटत नव्हते. त्यामुळे दोघांचे नेहमी वाद होत होते, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. वडिलांना डोळ्यांनी कमी दिसत होते. त्यामुळे दोघांचाही घातपात आहे की आत्महत्या आहे, यावर चर्चा सुरू आहे