scorecardresearch

वाशिम: ‘समृध्दी’ की अपघाताचा महामार्ग?

‘वेगवान इको स्पोर्ट’ दुभाजकावर धडकली

वाशिम: ‘समृध्दी’ की अपघाताचा महामार्ग?
समृध्दी महामार्गावर अत्यंत वेगाने नाशिक कडून नागपूर कडे जाणाऱ्या ईको स्पोर्ट गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला

अत्यंत गडबडीत आणि थाटामाटात समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मात्र, या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मंगरूळपीर पोलीस ठाणे हद्दीत समृध्दी महामार्गावर अत्यंत वेगाने नाशिक कडून नागपूर कडे जाणाऱ्या ईको स्पोर्ट गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना कारंजा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा >>>नागपूर: बोम्मईंचे ट्विटर खाते हॅक झाले याचा पुरावा काय?

समृध्दी महामार्गावर कारंजा जवळील चॅनल क्रमांक २०५ चॅनल जवळ आज शनिवारी ही घटना घडली. नाशिकवरून नागपूरकडे जाणाऱ्या इको स्पोर्ट गाडीचा टायर फुटल्याने ती दुभाजकावर धडकली. यामध्ये दोन जण गंभीर जखमी तर दोन जण किरकोळ जखमी झाले. जखमी नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 17:11 IST

संबंधित बातम्या