scorecardresearch

वाशीम: अपघातात दुचाकीस्वार अडकला ट्रकच्या दोन्ही चाकाच्या मधोमध

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर किन्हीराजा येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राच्या समोर भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वारास जबरदस्त धडक दिल्याने मोटारसायकलस्वार प्रदीप लोखंडे हा ट्रकच्या दोन्ही चाकाच्या मधोमध अडकला.

truck accident in vashim

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर किन्हीराजा येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्राच्या समोर भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वारास जबरदस्त धडक दिल्याने मोटारसायकलस्वार प्रदीप लोखंडे हा ट्रकच्या दोन्ही चाकाच्या मधोमध अडकला. यामध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली तर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची घटना आज ८ फेब्रुवारी रोजी घडली.

हेही वाचा >>>चंद्रपूर : शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याचा वाघाने घेतला घास! जंगलात लांब फरफटत नेले

औरंगाबाद-नागपूर महामार्गावर शेलूबाजारकडून मालेगांवकडे एम.एच. ३२ ए. जे. ३६७३ हा ट्रक भरधाव वेगाने जात असताना मागून आलेली एम.एच. ३७ ए.बी. ६४८२ ओव्हरटेक करण्याच्या नादात जबरदस्त धडक दिली. ट्रकच्या दोन्ही चाकाच्या मधात मोटारसायकल अडकल्याने दुचाकीस्वार प्रदीप लोखंडे रा. मुसळवाडी या युवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 16:54 IST
ताज्या बातम्या