बुलढाणा शहराजवळील येळगाव येथील आदिवासी आश्रमशाळेत लोखंडी प्रवेशद्वार पडून पहिल्या वर्गातील एका सात वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. रोशन रमेद दुबे असे मृत मुलाचे नाव आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येथील येळगाव येथील प्राथमिक आदिवासी आश्रम शाळेत पहिल्या वर्गात शिकणारा विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर प्रवेशद्वाराजवळ खेळत होता. यावेळी अचानक शाळेचे मुख्य लोखंडी प्रवेशद्वार विद्यार्थ्याच्या अंगावर पडले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. शाळेतील कर्मचाऱ्यांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, त्या विद्यार्थ्याचा अगोदरच मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

ragging case in Pune, pune,
पुण्यातील रॅगिंग प्रकरणाला धक्कादायक वळण! अधिष्ठाताच संशयाच्या भोवऱ्यात
A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !