एका शिक्षिकेचे शाळेत शिकवताना सहकारी शिक्षकासोबत सूत जुळले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे लग्न शक्य नसल्याचे लक्षात येताच शिक्षिकेेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शांतीनगरात घडली. दिशा (२८) असे आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचे नाव आहे.
हेही वाचा >>>वैद्यकीय शिक्षण खात्याचे बदली धोरण वादात; आयुर्वेद शिक्षकांच्या बदल्यांमुळे पदव्युत्तर जागा, ‘पीएचडी’ला कात्री
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा ही उच्चशिक्षित तरुणी एका शाळेत शिक्षिका होती. त्याच शाळेत अजय नावाचा सहकारी शिक्षकसुद्धा कार्यरत होता. शाळेत विद्यार्थ्यांना शिकवतानाच दोघांची मैत्री झाली. काही दिवसांतच त्यांचे एकमेकांचे सूत जुळले. दोघांचेही एकमेकांवर जिवापाड प्रेम होते. त्यांच्या प्रेमाची चर्चा शाळेतही होत होती. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपापल्या कुटुंबीयांची परवानगी घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिशाच्या कुटुंबीयांनी प्रेमविवाहास नकार दिला. त्यामुळे दोघांचीही निराशा झाली. मात्र, दोघांचेही प्रेम कायम होते. दोघांनाही विवाहासाठी स्थळे येत होती. परंतु, त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. शेवटी दिशाच्या आईवडिलांनी प्रियकर असलेल्या शिक्षकाशी लग्न करण्याची परवानगी दिली. त्यामुळे दिशा आनंदात होती. तिने लगेच अजयला फोन करून आनंदाची वार्ता दिली.
हेही वाचा >>>संमेलनाच्या मांडवातून.. कोटींची ‘कृतज्ञता’!
अजयने आईवडिलांशी चर्चा करून प्रेमविवाह करण्याचा निर्णय सांगितला. मात्र, यावेळी अजय यांच्या आईवडिलांनी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे दिशा नैराश्यात गेली. तेव्हापासून ती तणावात जीवन जगत होती. तिने अजयशी काही दिवसांपूर्वी चर्चा केली. त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आज शनिवारी सकाळी आठ वाजता घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘आता प्रियकर लग्नास तयार नाही. त्यामुळे मी निराश झाली आहे. माझी जगण्याची आशा संपली आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’ अशी चिठ्ठी लिहून ठेवली.