सावली तालुक्यातील निलसनी पेठगाव येथील शाळेच्या मागील भागातील टेकडी परिसरात सरपण आणण्यासाठी गेलेल्या कैलास लक्ष्मण गेडेकर (४६) या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज, बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
हेही वाचा >>>आठ दिवसांपासून मागावर, नजरेच्या टप्प्यात येताच ‘डॉट’ मारून…
कैलास हा मंगळवारी जंगलात गेला होता. रात्र झाल्यानंतरही घरी परत न आल्यामुळे बुधवारी सकाळच्या सुमारास कुटुंबीय व गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला. दुपारी बारा वाजतानंतर जंगलात त्याचा मृतदेह मिळाला. वाघाने त्याचे अर्धे शरीर खाल्ले होते. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी मृताच्या कुटुंबीयांना तात्काळ मदतही देण्यात आली.