scorecardresearch

“ती धडपडतेय उपचारासाठी, तिच्या बछड्यांसाठी पण…”, ताडोबातील वाघिणीची ह्रदयद्रावक कथा

बारकाईने निरीक्षण केले असता त्यांना तिचा मागचा पाय आणि तिच्या पंजाचे हाड खराब झालेले दिसून आले. ती चालण्यासाठी धडपडत होती आणि तिने केलेली गाईची शिकार सांभाळून ठेवण्यासाठी धडपडत होती.

“ती धडपडतेय उपचारासाठी, तिच्या बछड्यांसाठी पण…”, ताडोबातील वाघिणीची ह्रदयद्रावक कथा
"ती धडपडतेय उपचारासाठी, तिच्या बछड्यांसाठी पण…", ताडोबातील वाघिणीची ह्रदयद्रावक कथा

नागपूर: ती प्रचंड जखमी झाली आहे. तिला उपचाराची नितांत गरज आहे. मागचा पाय जवळजवळ खराब झाला आहे. पंजाचे हाड देखील खराब झाले आहे. भूकेचा आगडोंब उसळलाय, एक नाही तर दोघांची जबाबदारी तिच्यावर आहे, पण खाण्याची सोय करता येत नाही आणि त्यामुळे ती आणखीच हताश झाली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पांगडी बफर परिसरात एक वाघीण जखमी अवस्थेत आहे. त्यामुळे शिकार करता येत नसल्याने तिने तिचा मोर्चा आता बफरक्षेत्र आणि गावाकडे वळवला आहे. गावातील जनावरे मारून ती तिची भूक शांत करत आहे. रविवारी पर्यटक विश्वास उगले त्यांचे सहकारी अफरोज शेख, मकरंद परदेशी आणि आकाश गुंडावार यांच्यासह पांगडी बफरक्षेत्रात गेले असता त्यांना ही बलाढ्य वाघीण गाय मारताना दिसून आली. बारकाईने निरीक्षण केले असता त्यांना तिचा मागचा पाय आणि तिच्या पंजाचे हाड खराब झालेले दिसून आले. ती चालण्यासाठी धडपडत होती आणि तिने केलेली गाईची शिकार सांभाळून ठेवण्यासाठी धडपडत होती.

हेही वाचा: ‘लिस्ट लागणार आहे, जो पैसे देईल त्याचे नाव लिहा, न देणाऱ्यांचे…’, व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ

अचानक आणखी एक बलाढ्य वाघ मारून त्याठिकाणी आला आणि पुन्हा जखमी वाघिणीने पुन्हा आपल्या जीवाचे रक्षण करण्यासाठी जोरदार संघर्ष केला. त्यामुळे तिला आणखी दुखापत झाली. तिला दोन बछडे देखील असल्याने त्यांच्याही उदरभरणाची जबाबदारी तिच्यावर आहे. त्यांच्यासाठी तिला शिकार आणावी लागत आहे. वनविभागाला कळवल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही सकारात्मक वैद्यकीय मदतीचे आश्वासन दिले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 13:54 IST

संबंधित बातम्या