लोकसत्ता टीम

अकोला: ४१ डिग्री अं.से. तापमानामध्ये अंग भाजत असतांना एका आदिवासी महिलेची चक्क सिमेंटच्या रस्त्यावर प्रसुती झाल्याची धक्कादायक व मन सुन्न करणारी घटना अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे घडली. तीव्र उन्हात रस्त्यावर बाळाचा जन्म झाल्याने यंत्रणेच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. सुदैवाने परिसरातील महिला मदतीसाठी धावून आल्याने महिलेची सुखरुप प्रसुती झाली. आता बाळासह त्या महिलेला अकोल्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Doctor, Wainganga river, suicide,
चंद्रपूर: धक्कादायक! डॉक्टर मुलीने वैनगंगा नदीत उडी घेतली, आत्महत्या करण्यापूर्वी काढले व्हिडीओ
three devotees from titwala killed in road accident
टिटवाळ्यातील तीन भाविकांचा अपघातात मृत्यू; इगतपुरीमधील घोटीसिन्नर रस्त्यावर दुर्घटना
yavatmal woman death Tirupati marathi news
यवतमाळ: नेरच्या महिलेचा तिरुपती येथे अपघाती मृत्यू
Heavy rainfall causes flooding in Mumbai
प्रशासनाचे दावे पाण्यात; पहिल्या मोठ्या पावसात मुंबईची दाणादाण; रस्त्यांवर पाणी, रेल्वे ठप्प
extortion case
वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल; खंडणी प्रकरण
Pune Drugs Case, Police Investigation, Local Smuggler Supplied Mephedrone in pune, L3 Bar Party, Mephedrone in pune,
फर्ग्युसन रस्त्यावरील बार प्रकरण : पुण्यातील तस्कराकडून पार्टीत मेफेड्रोनचा पुरवठा
thane, Stray Dog Found Suspicious Dead in thane, Case Filed After Stray Dog Found Dead, Animal Lovers Suspect Poisoning or Beating dog in thane, dog suspicious dead in thane, thane news, animal lovers,
भटक्या श्वानाचा संशयास्पद मृत्यू, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Running Test in Navi Mumbai Police Recruitment on Concrete Road
नवी मुंबई पोलीस भरतीमध्ये काँक्रीटच्या रस्त्यावर धावणीची परिक्षा

सुरक्षित मातृत्वासाठी शासन विविध योजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र, ग्रामीण भागातील परिस्थितीत अद्यापही सुधारणा झाल्या नाहीत. आजही तळागाळापर्यंत सोयीसुविधा पोहोचल्या नाहीत. याचा प्रत्यय वाडेगाव येथील घटनेवरून येतो. वाशीम जिल्ह्यातील मुंगळा या गावतील एक कुटुंब कामासाठी वाडेगावातील एका शेतात आले होते. महिला गरोदर होती, अचानक पोट दुखू लागल्याने गरोदर महिला पतीसोबत वाडेगाव येथील खासगी दवाखान्यात तपासणीसाठी गेली. त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला थांबण्यास सांगितले. महिलेला वेदना असाह्य झाल्या.

हेही वाचा… चार दिवसाच्या बाळाची चोरी; चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील प्रकार

शेत मालकाने एका ऑटो चालकाला तत्काळ पाठविले व महिलेला पुढील उपचारांसाठी नेण्याचे प्रयत्न केले. महिलेला कळा सुरू झाल्या. परिसरातील महिलांच्या लक्षात येताच त्या रणरागिणी धावून आल्या. महिलेला साड्यांच्या कपड्यामध्ये झाकले अन् त्यामध्येच भर उन्हात महिलेने रस्त्यावर बाळाला जन्म दिला. प्रसूती झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. तेथे उपचार करून पुढील उपचारासाठी अकोल्यात पाठविण्यात आले.
या सर्व प्रकारामध्ये खासगी डॉक्टरने बेजबाबदारपणा केल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनीही सुरुवातीला दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.