scorecardresearch

Premium

चंद्रपूर : अपघातात गर्भवतीसह दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

खुटाळा गावातील लहूजी नगरातील निखील टावरी हे पत्नी नम्रता, मुलगा लक्ष व कनक या तिघांना घेवून रुग्णालयात जात होते.

crpf jawan committed suicide by hanging himself in Talegaon in pune
संग्रहित छायचित्र

पडोली-घुग्घुस मार्गावरील खुटाळा गावाजवळील राजस्थान फॅक्ट्रीजवळ भरधार ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात गर्भवती महिलेसह दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. नम्रता निखील टावरी (२५), लक्ष टावरी (२) अशी मृतांची नावे आहेत तर निखील टावरी व कनक टावरी, अशी जखमींची नावे आहेत.

खुटाळा गावातील लहूजी नगरातील निखील टावरी हे पत्नी नम्रता, मुलगा लक्ष व कनक या तिघांना घेवून रुग्णालयात जात होते. दरम्यान, राजस्थान फॅक्ट्रीजवळ धरभाव वेगात येणाऱ्या ट्रकने टावरी यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात गर्भवती नम्रता आणि लक्षचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पती निखील टावरी व कनक टावरी गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागिरकांनी ट्रकचालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी खुटाळा येथील गावकऱ्यांनी अवजड वाहतूक गावातून होवू नये, यासाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र, शनिवारी पुन्हा अवजड वाहनाने दोघांचा बळी घेतला. या घटनेमुळे लहूजी नगरात शोककळा पसरली आहे. पडोली पोलीस पुढील तपास करीत आहे.

Child death increased in Amravati
अमरावती, चिखलदरा, अकोल्यात बालमृत्यू वाढले
Two died by lightning
रायगड : वीज पडून दोघांचा मृत्यू, अलिबाग तालुक्यातील घटना
Youth died heart attack
सांगली : मिरवणुकीत नृत्य करताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू
Flood in Nagpur
Nagpur Rain : नागपुरात महापूर, एकाचा मृत्यू, ३५० जणांना सुरक्षित स्थळी हलवले

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A two year old child including a pregnant woman died in the accident amy

First published on: 02-07-2022 at 19:36 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×