चंद्रपूर : अपघातात गर्भवतीसह दोन वर्षीय बालकाचा मृत्यू

खुटाळा गावातील लहूजी नगरातील निखील टावरी हे पत्नी नम्रता, मुलगा लक्ष व कनक या तिघांना घेवून रुग्णालयात जात होते.

Dead Body
प्रतिनिधिक छायाचित्र

पडोली-घुग्घुस मार्गावरील खुटाळा गावाजवळील राजस्थान फॅक्ट्रीजवळ भरधार ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात गर्भवती महिलेसह दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी ११.४५ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले आहे. नम्रता निखील टावरी (२५), लक्ष टावरी (२) अशी मृतांची नावे आहेत तर निखील टावरी व कनक टावरी, अशी जखमींची नावे आहेत.

खुटाळा गावातील लहूजी नगरातील निखील टावरी हे पत्नी नम्रता, मुलगा लक्ष व कनक या तिघांना घेवून रुग्णालयात जात होते. दरम्यान, राजस्थान फॅक्ट्रीजवळ धरभाव वेगात येणाऱ्या ट्रकने टावरी यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात गर्भवती नम्रता आणि लक्षचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर पती निखील टावरी व कनक टावरी गंभीर जखमी झाले. घटनास्थळी उपस्थित नागिरकांनी ट्रकचालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी खुटाळा येथील गावकऱ्यांनी अवजड वाहतूक गावातून होवू नये, यासाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र, शनिवारी पुन्हा अवजड वाहनाने दोघांचा बळी घेतला. या घटनेमुळे लहूजी नगरात शोककळा पसरली आहे. पडोली पोलीस पुढील तपास करीत आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A two year old child including a pregnant woman died in the accident amy

Next Story
माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडेंना दोन वर्षांची शिक्षा ; शासकीय कामात अडथळा आणणे भोवले
फोटो गॅलरी