नागपूर : समृद्धी महामार्ग जेव्हा तयार होत होता तेव्हा या महामार्गावर काळविटांनी धावण्याची स्पर्धा घेतली होती. आता या महामार्गाचे उद्घाटन झाले तर काळविटांपाठोपाठ निलगायींनी धावण्याची स्पर्धा सुरू केली. माणसेच ती.. ती कशाला मागे राहतील.. मग त्यांनीही वाहनांची स्पर्धा सुरू केली. माणूस आणि वन्यप्राणी यांच्या स्पर्धेत बळी मात्र वन्यप्राण्यांचाच गेला. समृद्धी महामार्ग ओलांडणाऱ्या निलगायींचा व्हिडिओ बघून सरकारने वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा तर नाही ना तयार केला, अशी शंका आता यायला लागली आहे.

केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य तथा एसएनडीटी विद्यापिठाचे सिनेट सदस्य किशोर रिठे यांनी लोकसत्तासोबत समृद्धी महामार्ग ओलांडणाऱ्या निलगायींचा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ पाहताना या महामार्गाचे वास्तव देखील समोर येते. महामार्गाची ‘आऊटर वॉल’ अजूनही पूर्ण झालेली नाही. महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने ट्रकच्या वाहतुकीसाठी ती पूर्ण बांधलेली नाही. त्यामुळे अध्येमध्ये मोठा मोकळा ‘पॅच’ आहे.

Dissatisfaction in Ashok Chavans sphere of influence due to Shaktipeeth Highway
शक्तिपीठ महामार्गामुळे अशोक चव्हाणांच्या प्रभावक्षेत्रात असंतोष, नांदेडमध्ये भाजप उमेदवाराला फटका बसणार?
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
nitin gadkari
चावडी: मी प्रचार (नाही) करणार!
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

VIDEO::

अनेक ठिकाणी महामार्गाच्या दोन्ही बाजूने पहाड आहे. त्यामुळे ही ‘आऊटर वॉल’ तयार झाली तरीही पाच फूट असणारी ही भिंत दोन फुटाच्या भिंतीचे काम करणार आहे. त्यामुळे वन्यप्राणी सहज ही भिंत ओलांडून हा महामार्ग ओलांडणे शक्य आहे. गेल्या काही दिवसात वन्यप्राण्यांचे गेलेले बळी पाहता आणि रस्ता ओलांडणारे वन्यप्राणी पाहता त्या त्या ठिकाणी वनखात्याची, महामार्ग प्राधिकरणाची देखरेख आवश्यक आहे. त्या ठिकाणी आणखी कोणत्या उपशमन उपाययोजना करता येऊ शकतात, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, समृद्धी महामार्गाच्या नावावर पाठ थोपटून घेणाऱ्या राज्यसरकारला वन्यप्राण्यांशी काहीच देणेघेणे नाही, हे आतापर्यंतच्या प्रसंगातून दिसून आले आहे.