scorecardresearch

Premium

यवतमाळ : सोनोग्राफीत गर्भ सुस्थितीत, मात्र जन्म झाल्यानंतर…; डॉक्टरांना हलगर्जीपणा भोवला

ग्राहक आयोगाने दोन डॉक्टरांना दोषी ठरवत ४० लाख रुपये दंड ठोठावला आहे. यात एका स्त्रीरोग तज्ज्ञासह एका सोनोग्राफी तज्ज्ञाचा समावेश आहे.

woman gave birth disabled child
यवतमाळ : सोनोग्राफीत गर्भ सुस्थितीत, मात्र जन्म झाल्यानंतर…; डॉक्टरांना हलगर्जीपणा भोवला (image – pixabay/representational image/ loksatta graphics)

यवतमाळ : एका महिलेस गर्भधारणा झाल्यानंतर वैद्यकीय तपासणीत हयगय केल्याने अपंग अपत्य जन्माला आले. याप्रकरणी महिलेच्या पतीने ग्राहक मंचात येथील दोन डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल केली. ग्राहक आयोगाने या प्रकरणी येथील दोन डॉक्टरांना दोषी ठरवत ४० लाख रुपये दंड ठोठावला आहे. यात एका स्त्रीरोग तज्ज्ञासह एका सोनोग्राफी तज्ज्ञाचा समावेश आहे.

आर्णी येथील श्रीकांत वसंतराव राठोड यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर २० सप्टेंबर रोजी आयोगाने दिलेल्या या निर्णयाने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आर्णी येथील मनीषा श्रीकांत राठोड या गर्भवती असताना त्या यवतमाळ येथील डॉ. अर्चना वीरेंद्र राठोड यांच्याकडे उपचार घेत होत्या. डॉ. राठोड यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी येथील डॉ. आशिषकुमार लोहिया यांच्या मंगलमूर्ती डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोनोग्राफी केली. त्यावेळी मनीषा यांच्या पोटातील गर्भ सुस्थितीत असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यंग नसल्याची माहिती सोनोग्राफी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

supriya sule
रुग्णालयांतील मृत्यूकांडप्रकरणी सुप्रिया सुळेंचा मोठा निर्णय, म्हणाल्या, “रुग्णांच्या सजग आरोग्य सुविधांसाठी…”
nanded death tragedy
नांदेड मृत्यू प्रकरणाची बालहक्क संरक्षण आयोगाकडून दखल; चौकशीतून दोषी निश्चित करण्याचे पोलिसांना आदेश
MPSC Question paper was leak
ही तर हद्दच झाली! चक्क स्पाय कॅमेऱ्याचा वापर करुन ‘एमपीएससी’ची प्रश्नपत्रिका फोडली
marathwada, cabinet meeting, compitative examination, student, dorught, farmer
शेतकऱ्यांसह स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यानाही मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीने दिलासा द्यावा

हेही वाचा – नागपुरातील पुरात दहा हजार घरांचे नुकसान, फडणवीसांचा दौरा, मदतीचे आश्वासन

प्रत्यक्षात मात्र प्रसूतीनंतर नवजात बाळाला दोन्ही हाताला प्रत्येकी चार बोटं होती. पायाला हाड नव्हते, तर पाय व पायाची बोटेही व्यवस्थित नव्हती. त्यामुळे श्रीकांत राठोड यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेत तपासणीत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर आणि सोनोग्राफी तज्ज्ञांची हयगय झाल्याने नुकसानभरपाई मिळावी, यासाठी तक्रार दाखल केली.

यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. यामध्ये डॉ. अर्चना राठोड आणि डॉ. आशिषकुमार लोहिया यांनी उपचार आणि तपासणीत हयगय केल्याचे स्पष्ट झाल्याने आयोगाने दोन्ही डॉक्टरांवर ठपका ठेवला. या प्रकरणी डॉ. अर्चना राठोड व डॉ. आशिषकुमार लोहिया यांनी तक्रारकर्ते श्रीकांत राठोड यांना प्रत्येकी २० लाख रुपये अशी एकूण ४० लाख रुपये भरपाई द्यावी, मानसिक व शारीरिक त्रासापोटी प्रत्येकी दहा हजार आणि तक्रार खर्चाचे तीन हजार द्यावे, असा आदेश दिला आहे.

हेही वाचा – वर्धा : निर्माल्याचे पावित्र्य जपावे म्हणून स्वतंत्र निर्माल्य वाहन, शिवमंदिर भगिनी मंडळाचा पुढाकार

ग्राहक आयोगाच्या या आदेशाने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, डॉक्टरांच्या हलगर्जीपणाविरोधात न्याय मिळू शकतो, हा विश्वास नागरिकांना दिला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A woman gave birth to a disabled child after carelessness in medical check nrp 78 ssb

First published on: 24-09-2023 at 15:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×