scorecardresearch

नागपूर: मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

आशीष दिगांबर मराठे (२७) असे या तरुणाचे नाव असून तो मूळ निवासी भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे.

death by drowning
मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

मित्राच्या वाढदिवसाची पार्टीसाठी मोहगाव (झिल्पी) तलावावर गेलेल्या एका तरुणांचा तेथे बुडून मृत्यू झाला. रविवारी सांयकाळी ही घटना घडली. सोमवारी सकाळी त्या तरुणाचा मृतदेह अग्निशामक दलाच्या पथकाने बाहेर काढला.

हेही वाचा >>>बुलढाणा: वेदनांची तमा न बाळगता कॅन्सरग्रस्त रुग्णाने बजावला मतदानाचा हक्क

आशीष दिगांबर मराठे (२७) असे या तरुणाचे नाव असून तो मूळ निवासी भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. सध्या तो खापरी पुनर्वसन कॉलनीत वास्तव्याला होता आणि ॲमेझॉन कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता. २९ जानेवारीला रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास आशीष व त्यांचे काही मित्र प्रदीप बावनकर यांच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मोहोगाव( झिल्पी) तलाव येथे गेले. वाढदिवसाची पार्टी आटोपल्यानंतर आशीष पाय धुण्यासाठी तलावात उतरला. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला.त्याच्या मदतीसाठी अतुल खडसे व अन्य दोन मित्र धावले. मात्र आशीष पाण्यात खोलवर गेल्याने ते तलावा बाहेर आले.

हेही वाचा >>>धक्कादायक! गोंडवाना विद्यापीठाच्या खेळाडू विद्यार्थिनींसोबत प्रशिक्षक व व्यवस्थापकाचे मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन

बराच वेळ थांबूनही आशीष बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांनी हिंगणा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अग्निशामक दलाला बोलावले. त्यांनी तलावात शोध मोहीम राबवली मात्र रात्र झाल्याने ती थांबवण्यात आली. सोमवारी सकाळी ६ वाजता पुन्हा अग्निशामक दलाने शोध मोहीम सुरू केली असता सकाळी ९ वाजताच्या दरम्यान आशीष चा मृतदेह सापडला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 18:48 IST