यवतमाळ : वणी येथील जैन लेआऊट परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटमध्ये युवतीचा संशयास्पद स्थितीतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणीच्या डोक्यावर जखमा आढळून आल्या. प्रिया रेवानंद बागेसर (२५) असे मृत तरुणीचे नाव आहे. सोमवारी उजेडात आलेल्या या घटनेने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

प्रिया कृष्णा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक चारमध्ये भाड्याने राहत होती. सोमवारी सकाळी या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. वणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप सिरस्कर व त्यांचे सहकारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यावेळी फ्लॅटचे दार बाहेरून लावलेल्या स्थितीत आढळले. पोलिसांनी दार उघडून बघितले असता, जमिनीवर तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
Chandrapur, beats sister, stick , death, phone call, boy, police, arrest accused, crime news, marathi news,
धक्कादायक… मोबाईलवर मुलाशी संवाद साधणाऱ्या बहिणीची भावाकडून हत्या

हेही वाचा >>> कट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार…, असा होता खासदार धानोरकर यांचा राजकीय प्रवास

प्रिया बागेसर ही तरुणी पूर्वी वरोरा येथील एकर्जुना रोडवर असलेल्या एका वसाहतीत राहत होती. काही दिवसांपूर्वीच ती वणीत राहायला आली होती. तिच्याच फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने तिने आत्महत्या केली की तिचा कोणी खून केला, याबाबत तर्क लावले जात आहे. फ्लॅटचे दार बाहेरून बंद असल्याने तिचा खूनच झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तपासाची दिशा स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरीही घातपाताच्या दिशेनेच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा >>> “करायला गेले काय अन् उलटे झाले पाय”, अकोल्यात हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या चौघांवर गुन्हा दाखल

तरूणी एकच, नावे दोन!

फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळलेली तरूणी दोन नावांनी वावरत असल्याचे पुढे आले आहे. वरोरा येथे प्रिया बागेसर नावाने राहणारी ही तरूणी वणीत मात्र आरोही वानखेडे या नावाने वावरत असल्याची माहिती पुढे आली. ती वणीत नाव बदलून का राहत होती, याचाही तपास पोलीस करत आहेत.