Premium

यवतमाळ : बंद फ्लॅटमध्ये युवतीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला; आत्महत्या की हत्या? चर्चांना उधाण

वणी येथील जैन लेआऊट परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटमध्ये युवतीचा संशयास्पद स्थितीतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

crime dead body
सांगली जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणाचा कागल तालुक्यात खून

यवतमाळ : वणी येथील जैन लेआऊट परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटमध्ये युवतीचा संशयास्पद स्थितीतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत तरुणीच्या डोक्यावर जखमा आढळून आल्या. प्रिया रेवानंद बागेसर (२५) असे मृत तरुणीचे नाव आहे. सोमवारी उजेडात आलेल्या या घटनेने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रिया कृष्णा अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक चारमध्ये भाड्याने राहत होती. सोमवारी सकाळी या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. वणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप सिरस्कर व त्यांचे सहकारी घटनास्थळावर दाखल झाले. त्यावेळी फ्लॅटचे दार बाहेरून लावलेल्या स्थितीत आढळले. पोलिसांनी दार उघडून बघितले असता, जमिनीवर तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

हेही वाचा >>> कट्टर शिवसैनिक ते काँग्रेसचा राज्यातील एकमेव खासदार…, असा होता खासदार धानोरकर यांचा राजकीय प्रवास

प्रिया बागेसर ही तरुणी पूर्वी वरोरा येथील एकर्जुना रोडवर असलेल्या एका वसाहतीत राहत होती. काही दिवसांपूर्वीच ती वणीत राहायला आली होती. तिच्याच फ्लॅटमध्ये तिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने तिने आत्महत्या केली की तिचा कोणी खून केला, याबाबत तर्क लावले जात आहे. फ्लॅटचे दार बाहेरून बंद असल्याने तिचा खूनच झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तपासाची दिशा स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तरीही घातपाताच्या दिशेनेच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा >>> “करायला गेले काय अन् उलटे झाले पाय”, अकोल्यात हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या चौघांवर गुन्हा दाखल

तरूणी एकच, नावे दोन!

फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळलेली तरूणी दोन नावांनी वावरत असल्याचे पुढे आले आहे. वरोरा येथे प्रिया बागेसर नावाने राहणारी ही तरूणी वणीत मात्र आरोही वानखेडे या नावाने वावरत असल्याची माहिती पुढे आली. ती वणीत नाव बदलून का राहत होती, याचाही तपास पोलीस करत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A young woman dead body was found in a closed flat nrp 78 ysh

First published on: 30-05-2023 at 11:13 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा