अमरावती : लग्नासाठी स्थळ म्हणून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने तरुणीवर अतिप्रसंग केला. ही धक्कादायक घटना धारणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश मोतीराम कासदेकर (२७) रा. चंदनपूर, अकोला असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो लातूर येथे कार्यरत आहे. पीडित २२ वर्षीय तरुणीच्या लग्नासाठी तिच्या भावाच्या एका मित्राच्या माध्यमातून राजेश कासदेकर याचे स्थळ आले होते. त्यामुळे त्यांची ओळख झाली.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

हेही वाचा – भाषण न करताही नागपूरमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी अजित पवारच

त्यानंतर राजेशने पीडित तरुणीला संदेश पाठवून तू मला पसंत आहे, तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे म्हटले. दोघांमध्ये संवाद सुरू झाल्यावर राजेश हा पीडित तरुणीला भेटायला धारणीला येत होता. यावेळी घरी कुणी नसताना राजेशने अनेकदा पीडित तरुणीचे लैंगिक शोषण केले. त्यामुळे पीडित तरुणीने त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र, राजेशने तिला स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे पीडित तरुणीने धारणी ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजेशविरुद्ध बलात्कार व विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.