scorecardresearch

Premium

नागपूर: तरुणाची तलावात उडी घेऊन आत्महत्या

शंकर रामदास बडवाईक (३०) रा. माऊलीनगर, वाडी असे मृताचे नाव आहे.

youth committed suicide jumping Ambazari lake nagpur
तरुणाची तलावात उडी घेऊन आत्महत्या

नागपूर: अंबाझरी तलावात उडी घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. शंकर रामदास बडवाईक (३०) रा. माऊलीनगर, वाडी असे मृताचे नाव आहे. चार दिवसांपूर्वीही त्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही युवकांची टोळी तलावाच्या काठाजवळ उभी होती, त्यामुळे त्याने आत्महत्येचा निर्णय बदलवला होता.

शंकर बडवाईक हा मूळचा अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथील रहिवासी होता. नागपुरात एका ट्रांसपोर्ट कंपनीमध्ये ट्रक चालकाचे काम करीत होता. मित्रासोबत भाड्याने खोली करून रहात होता. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शंकर अंबाझरी तलाव परिसरात पोहोचला. काही वेळ काठाच्या भिंतीवर उभा राहिला. त्यानंतर अचानक पाण्यात उडी घेतली. आसपासच्या लोकांना वाटले की, त्याने पोहण्यासाठी तलावात उडी घेतली आहे.

boy committed suicide sister refused give mobile phone nagpur
नागपूर: मोबाईलसाठी ११ वर्षीय मुलाची आत्महत्या
girl raped youth Ramtek nagpur
नागपूर: रामटेकमध्ये मुलीवर बलात्कार
Akola Ganpati
अकोला जिल्ह्यात ३०२ ‘एक गाव, एक गणपती’; १७३२ मंडळांमध्ये गणपतीची स्थापना
Congress Sharad Pawar group Youth leaders Rohit Pawar Rohit Patil enjoyed Tarri Pohe Shamji Pohewale nagpur
आमदार रोहित पवार… रोहित पाटील.. आणि नागपूरचे झणझणीत तर्री चणा पोहे; काय आहे वाचा…

हेही वाचा… भंडारा जिल्ह्यात दलित – सवर्ण वाद; जातीवाचक शिवीगाळचा आरोप; ७ जणांवर गुन्हे

मात्र जेव्हा तो गंटागळ्या खाऊ लागला घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. अंबाझरी पोलीस घटनास्थळावर पोहोचले. तोपर्यंत उशीर झाला होता. पाण्यात बुडून शंकरचा मृत्यू झाला होता. अग्निशमन विभागाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सांगण्यात येते की, चार दिवसांपूर्वीही तो आत्महत्या करण्यासाठी अंबाझरी तलाव परिसरात गेला होता, मात्र नंतर त्याने निर्णय बदलला. त्याने आपल्या मित्राला याबाबत सांगितले होते. शंकरच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A youth committed suicide by jumping into ambazari lake nagpur adk 83 dvr

First published on: 03-10-2023 at 09:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×