लोकसत्ता टीम

नागपूर: एका विधवा महिलेशी जवळीक साधून एका युवकाने बलात्कार केला. त्यातून ती पाच महिन्यांची गर्भवती झाली. विधवेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गोपीचंद साठवणे (गारळा) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
3000 Women in Akola, Read Constitution s Preamble, 75 thousand times, Amrit Jubilee Year, 75 year of indian constition, akola news, indian constitution news, indian constitution reading, 3000 Women reading constitution,
अकोला : तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधान प्रस्तावनेचे वाचन
Government failure to take action against misleading companies Supreme Court verdict on Patanjali case
दिशाभूल करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईबाबत सरकार अपयशी; पतंजली प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशोरे
Dombivali K V Pendharkar College Sports Complex Inaugurated Retired Justice Hemant Gokhale
ऑलिम्पिकमध्ये झळकण्यासाठी क्रीडासंकुलांची गरज, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचे प्रतिपादन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौद्यात राहणाऱ्या पीडित २६ वर्षीय महिला संजना (काल्पनिक नाव) हिच्या पतीचे मार्च २०२१ मध्ये दुर्धर आजाराने निधन झाले. त्यानंतर ती दोन वर्षांच्या मुलीला घेऊन कामाच्या शोधात गुमथळा येथे राहायला गेली. तेथे तिचा मानलेला भाचा सलमान याचे तिच्या घरी येणे-जाणे होते.

हेही वाचा… वर्धा: बेरोजगारांसाठी खुशखबर… ४ हजार ६२५ पदांची भरती, सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा…

काही दिवसानंतर सलमानचा मित्र आरोपी गोपीचंद साठवणे हा यायला लागला. त्याने विधवा असलेल्या संजनाच्या एकाकीपणाचा गैरफायदा घेत संबंध वाढवले. त्यानंतर तो मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन बळजबरी लैंगिक अत्याचार करायला लागला. त्याच्या त्रासाला कंटाळून संजनाने पुन्हा मौदा शहर गाठले. तिची प्रकृती बिघडल्याने ती डॉक्टरकडे गेली. ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. तिने गोपीचंदला फोन करून ही माहिती दिली असता त्याने ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली. विधवा असून गर्भवती झाल्यामुळे तिची समाजात बदनामी झाली. तिने मौदा पोलिसात गोपीचंदविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.