scorecardresearch

यवतमाळ: मध काढायला झाडावर चढला अन्…

आग्या मोहोळचे मध काढायला झाडावर चढलेल्या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला.

यवतमाळ: मध काढायला झाडावर चढला अन्…
रवींद्र तुळशीराम बोरचाटे

आग्या मोहोळचे मध काढायला झाडावर चढलेल्या युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी यवतमाळ तालुक्यातील वाटखेड येथे घडली.

हेही वाचा >>>बुलढाणा: प्रसाद लाड यांना शिवरायांनी सुद्बुद्धी द्यावी; केळवदवासीयांची प्रार्थना

रवींद्र तुळशीराम बोरचाटे (३२), असे मृताचे नाव आहे. रवींद्रच्या पत्नीचा २० दिवसांपूर्वीच अपघाती मृत्यू झाला होता. आता त्याचाही मृत्यू झाल्याने बोरचाटे दाम्पत्याच्या दोन मुली पोरक्या झाल्या आहेत. बुधवारी रवींद्र आपल्या मित्रांसह गावशिवारात असलेल्या झाडावर आग्या मोहोळ झाडण्यासाठी गेला होते. मध धरण्यासाठी तो झाडावर चढला. नेमकी या झाडाखाली विहीर आहे. मोह झाडताना तोल जाऊन रवींद्र थेट विहिरीत पडला. त्याच्या मदतीसाठी सोबतचे मित्र धावले. मात्र, तोपर्यंत रवींद्रचा बुडून मृत्यू झाला होता.

हेही वाचा >>>बुलढाणा: राज्यपालांसह, भाजप नेत्यांविरोधात सर्वधर्मीय शिवप्रेमी आक्रमक; देऊळगावराजा शहर कडकडीत बंद

रवींद्रची पत्नी पूजा बोरचाटे ही २० दिवसांपूर्वी दारव्हा तालुक्यातील तळेगाव येथे माहेरी ऑटोरिक्षाने जात असताना ऑटोतून खाली पडून गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला होता. रवींद्रला दोन मुली आहेत. २० दिवसांत आई-वडिलांचा मृत्यू झाल्याने दोन्ही मुली पोरक्या झाल्या असून, गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 20:11 IST

संबंधित बातम्या