वाशिममधील गायरान जमीन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून आज विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळालं. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ३७ एकर गायरान जमीन सत्तेचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला वाटप केली, असा आरोप करत, विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली.

हेही वाचा – “मठात बसून गांजा फुकणाऱ्यांनी…”; कालीचरण महाराजांच्या वादग्रस्त विधानावरून अमोल मिटकरी संतापले

eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर
aap protests on delhi road against arvind kejriwal s arrest
‘आप’ विरुद्ध भाजप; केजरीवाल यांच्या समर्थनार्थ ‘आप’ची निदर्शने, भाजपकडून राजीनाम्याची मागणी

काय म्हणाले अब्दुल सत्तार?

विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केल्यानंतर अब्दुल सत्तार हे पहिल्यांच नागपूरमध्ये दिसून आले. यावेळी पत्रकरांनी त्यांना विरोधकांनी केलेल्या आरोपाबद्दल विचारलं असता, त्यांनी उत्तर देणं टाळले. ”माझ्यावरील आरोप हे सभागृहात करण्यात आले, त्यामुळे मी या आरोपाचे उत्तरही मी सभागृहातच देईन”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अजित पवारांकडून राजीनामाची मागणी

दरम्यान, आज या मुद्द्यावरून विधानसभेच चांगलाच गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. यावेळी विरोधकांनी आक्रमक होतं अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यासंदर्भात बोलताना राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार म्हणाले, “नागपूर खंडपीठाने कृषीमंत्र्यांविरोधात कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशीम जिल्ह्यातील १५० कोटींची ३७ एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिली. त्यांनी कायदेशीर बाबींचं उल्लंघन केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ठोस पुरावे आहेत. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. राज्य सरकार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय़ माहिती असतानाही एका व्यक्तीला फायदा मिळवून देण्यात आला. त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी,” अशी मागणी अजित पवारांनी केली.

हेही वाचा – “सीमाप्रश्नाबाबत सरकार लवकरच विधिमंडळात ठराव आणणार”; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; म्हणाले, “काही लोकांकडून…”

अमोल मिटकरींची सत्तारांवर टीका

अजित पवार यांच्यावरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही अब्दुल सत्तारांवर टीकास्र सोडले. यावेळी अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर “वसुली भाई, सत्तार भाई” अशी घोषणाबाजी केली. तर अब्दुल सत्तारमध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.