नागपूर :  आदिवासी समाजातील अत्यंत गरीब तीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विधी विद्यापीठाची प्रवेशपूर्व परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु त्यांच्याकडे प्रवेश घेण्यासाठी पैसे नव्हते. होतकरू आदिवासी विद्यार्थ्यासाठी काम करणाऱ्या निवृत्त आदिवासी अधिकाऱ्यांची स्वंयसेवी संस्था या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आली. त्यांनी ऐनवेळी केलेल्या आर्थिक मदतीमुळे या विद्यार्थ्यांचे विधि विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

कमलेश भगतीसिंह तुलावी, कल्याणी बलदेव कोटवार व खुशी रमेश वाडीवे या तीन आदिवासी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची प्रवेश पूर्व परीक्षा उत्तीर्ण केली. तेथे ३ लाख ६५ हजार रुपये प्रवेश शुल्क आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार रुपये विद्यार्थ्यांना भरावे लागते. विद्यार्थी गरीब असल्याने त्यांना ही रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांचे प्रवेश प्रवेश रद्द होणार होते. ही बाब आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांना कळली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन गोंडवाना ट्रायबल फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्त्यांना आर्थिक मदत मिळवून दिली.  समाज कल्याण विभागाचे सेवा निवृत्त सहआयुक्त आर. डी. आत्राम, सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे व अधीक्षक अभियंता उज्वल धाबे यांनी तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयाची मदत केली.

As many as three lakh fake notes brought from Bangladesh
धक्कादायक! बांगलादेशातून आणल्या तब्बल तीन लाख बनावट नोटा; आंतरराज्यीय टोळी…
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Young farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकरी ठार
in Amravati father abuses daughter and threatens to kill her
घृणास्पद! जन्मदात्या वडिलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
PM Narendra Modi
नरेंद्र मोदींचा मोठा दावा, “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणारच, हे घडल्यावर मला…”
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
Devendra Fadnavis on Eknath Shinde
“एकनाथ शिंदेंना अपमानित करायचे नव्हते, म्हणून…”, ठाणे लोकसभेवरून देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान
Praful Patel
जिरेटोपाच्या वादावर प्रफुल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “यापुढे काळजी…”

हेही वाचा >>>बुद्ध पौर्णिमेला मेळघाटात निसर्ग अनुभव ; वनविभाग सज्‍ज, १३१ मचाणांवरून…

आदिवासी होतकरु गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता मदत व्हावी यासाठी गोंडवाना ट्रायबल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. फाउंडेशन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी यासाठी समाजाने फाउंडेशनला आर्थिक सहकार्य करावे, असे आवाहन फाऊंडशनचे सचिव डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी आवाहन केले आहे.