scorecardresearch

Premium

बुलढाणा: एसटी बस व मालवाहू वाहनाची धडक; विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी

लाखनवाडा (तालुका खामगाव) ते उदयनगर (तालुका चिखली) मार्गावरील पिंप्री कोरडे नजीक आज, मंगळवारी ही दुर्घटना घडली.

Accident goods vehicle st bus chikhli buldhana
एसटी बस व मालवाहू वाहनाची धडक; विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

बुलढाणा: भरधाव मालवाहू वाहन व महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. तसेच बसमधील विद्यार्थी व प्रवासी जखमी झाले.

लाखनवाडा (तालुका खामगाव) ते उदयनगर (तालुका चिखली) मार्गावरील पिंप्री कोरडे नजीक आज, मंगळवारी ही दुर्घटना घडली. खामगाव एसटी बस आगाराची ही बस २० विद्यार्थ्यांसह ४७ प्रवासी घेऊन उदयनगर कडे निघाली होती. दरम्यान, पिंप्री कोरडे नजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहन व बसची धडक झाली.

mumbai to nagpur distance in eight hours
मुंबई ते नागपूर अंतर जुलैपासून आठ तासांत; भरवीर ते इगतपुरी टप्पा आजपासून सेवेत
20 lakhs bribe General Manager of National Highways Authority is arrested
तब्बल २० लाखांची लाच; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा सरव्यवस्थापक जाळ्यात
MP Hema Malini says Krishna temple will be built in Mathura soon
खासदार हेमा मालीनी म्हणतात, ‘मथुरेत कृष्ण मंदिर लवकरच साकार होणार’
If there is no alliance with Mavia there will be a BJP vs Vanchit fight in Maharashtra says prakash ambedkar
…तर महाराष्ट्रात वंचित विरूद्ध भाजप अशीच लढत, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

हेही वाचा… आंतरराज्य जनावरे तस्करी; १० जणांविरुद्ध गुन्हा

धडक इतकी भीषण होती की, दोन्ही वाहनांचे समोरील भागाची (चालक कक्षची) मोडतोड झाली. यामुळे दोन्ही चालक गंभीर जखमी झाले तर विद्यार्थी व प्रवासी किरकोळ जखमी झाले. दोन्ही वाहनांची मोडतोड झाली. माहिती मिळताच पोलीस व एसटी विभाग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accident between goods vehicle and a st bus near chikhli in buldhana both drivers were seriously injured passengers including students also injured scm 61 dvr

First published on: 05-12-2023 at 14:03 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×