बुलढाणा: नाशिक ते नागपूर एसटी बस चालविणाऱ्या चालकाचा अंदाज चुकला आणि बस थेट रस्ते दुभाजकावर चढली यामुळे ४७ प्रवाश्यांच्या हृदयाचे ठोके वाढले..मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत न झाल्याने चालकाने सुटकेचा श्वास सोडल.मलकापूर येथे आज सकाळी सहाच्या सुमारास हा विचित्र परंतु तितकाच मजेदार अपघात घडला. काहीही करून खाली उतरण्यास तयार नसलेल्या बसला अखेर क्रेन च्या मदतीने रस्त्यावर आणण्यात आले. यानंतर ही बस पुढील प्रवासाकडे रवाना झाली.
नाशिक आगाराची ही लांब पल्ल्याची एसटी बस (नाशिकवरून ) नागपूरला जात होती. जिल्ह्यातील मलकापूर शहरात महामार्गावर असलेल्या दुभाजकाचा चालकाला अंदाज न आल्याने बस दुभाजकावर चढली! यामुळे बसमधील प्रवासी व बघ्यांच्या जीवाचा थरकाप उडाला. या बस मध्ये ४७ प्रवासी प्रवास करत होते. मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाले नाही. बस दुभाजकात फसल्याने शेवटी क्रेनच्या साहाय्याने एसटी बसला दुभाजकावरून बाहेर काढण्यात आले.