नागपूर : देशात रस्ते अपघाताबाबत पोलीस आणि शासन गंभीर नसल्यामुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दहा वर्षांत देशभरात झालेल्या अपघातात १५ लाख ३० हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अपघातांमध्ये बळींच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक आहे तर पहिल्या-दुसऱ्या स्थानावर उत्तरप्रदेश आणि तामिलनाडू गेल्या दोन वर्षांपासून कायम आहेत. ही आकडेवारी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावरुन प्राप्त झाली आहे.

राज्यात वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन होत होत नाही तसेच परिवहन विभाग, वाहतूक पोलीसही अपघाताच्या बाबतीत फारसे गंभीर नाहीत. परिणामतः जवळपास ८० टक्क्यांपेक्षा जास्त वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. पोलीस विभागाच्या निष्काळजीपणामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहतूक सिग्नल ओलांडल्यास वाहतूक पोलीस केवळ शे-दोनशे रुपयांची लाच घेण्यासाठी कारवाईची भीती दाखवतात. त्यामुळे वाहनचालकांमध्ये वाहतूक पोलिसांचा वचक राहिला नाही. तसेच पोलीस जनजागृतीपेक्षा थेट वसुली करण्यावर भर देत आहे. तसेच भ्रष्टाचारात बुडालेला परिवहन विभागसुद्धा वाहन चालविण्याचे परवान डोळे झाकून देण्यात मश्गूल असते. या दोन्ही कारणामुळे रस्ते अपघात वाढत आहेत. केंद्रीय रस्ते मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या २०१३ ते २०२३ या दहा वर्षांत देशात १५ लाख ३० हजार नागरिकांनी जीव गमावला. हा आकडा नैसर्गिक आपत्तींमध्ये बळी गेलेल्यांपेक्षाही जास्त असल्याची माहिती आहे. २००४ ते २०१२ या वर्षांच्या कालावधीत देशात १२ लाखांवर लोकांनी रस्ते अपघातात जीव गमावला. २०२३ मध्ये १ लाख ७३ हजारांहून अधिक लोक रस्ते अपघातात मरण पावले आहेत. दररोज सरासरी ४७४ मृत्यू किंवा दर तीन मिनिटांनी रस्ते अपघातात एकाचा मृत्यू होत आहे. ही आकडेवारी बघता आतातरी शासनाने अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

pune ranked 4th globally for traffic congestion as tomtom traffic index report
विश्लेषण : वाहतूक कोंडीचे परिणाम काय?
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
High Court question Home Department and Director General of Police to take action against illegal loudspeakers at religious places mumbai news
धार्मिकस्थळांवरील २,९४० बेकायदा ध्वनिक्षेपकांवर काय कारवाई केली? उच्च न्यायालयाची गृह विभागासह पोलीस महासंचालकांना विचारणा
Mumbai Nashik Highway Accident Latest Updates in Marathi
Mumbai Nashik Highway Accident : मुंबई नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा भीषण अपघात, तीन जण जागीच ठार
Dombivli illegal hoardings loksatta news
डोंबिवलीत बेकायदा फलक लावणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी गुन्हे, पाच हजार फलकांवर कारवाई
Vashi toll plaza toll exemption traffic congestion mumbai entryways
टोलमुक्तीनंतरही कोंडी कायम, वाशी टोलनाक्यावर दोन्ही प्रवेशमार्गांवर वाहतुकीचा ताण
roads Mumbai roads mechanical sweepers mumbai,
मुंबईतील रस्ते आणखी चकचकीत, मार्चपर्यंत १५ यांत्रिकी झाडू, कचरा उचलणारी यंत्रे घनकचरा विभागाच्या ताफ्यात
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा…नागपूर हिवाळी अधिवेशन पाचच दिवसांचे ? वैदर्भीय नाराज

१० राज्यात अपघातांचे प्रमाण वाढले

देशात उत्तरेकडील राज्यांमध्ये रस्ते अपघात वाढले आहेत. २०२३ मध्ये १.७३ लाखांहून अधिक लोक रस्ते अपघातात मरण पावले आहेत. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि तेलंगणा या राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातात वाढ झाली आहे.

हेही वाचा…गोंदिया : व्हीव्हीपॅट, ईव्हीएमवर शंका! आणखी एक काँग्रेस उमेदवाराचा पुनर्मोजणीसाठी अर्ज…

अपघातामध्ये ‘टॉप – ५’ राज्ये

उत्तरप्रदेश – २३,६५२

तामिळनाडू – १८,३४७

महाराष्ट्र – १५,३३६

मध्यप्रदेश – १३,७९८

कर्नाटक – १२,३२१

Story img Loader