लोकसत्ता टीम

नागपूर : अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन राजकुमार यांच्या नेतृत्वातील तपास पथकाने पारडीतून कुख्यात वाहनचोर इरफान अन्सारीला मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले होते. त्याने केलेल्या अन्य वाहन चोरीच्या घटनांची चौकशीसाठी त्याला अटक करण्यात आली. त्याची चौकशी करण्यात आली. त्याला पुन्हा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. बुध‌वारी पहाटेच्या सुमारास लॉकअप गार्ड असलेला पोलीस कर्मचारी झोपल्याचे इरफान अन्सारीच्या लक्षात आले. त्याने पोलिसांना गुंगारा देऊन पोलीस ठाण्यातून पळ काढला.

Child dies in husband-wife fight Crime of culpable homicide against man
पतीने रागाच्‍या भरात पत्‍नीला मारली लाथ, कडेवरील चिमुकलीचा खाली पडून…
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
minor girl sexualy abused by lover in nagpur
नागपूर : मध्यरात्री अल्पवयीन मुलगी प्रियकराच्या मिठीत; वडिलांनी…
man raped minor girl under railway bridge in nagpur
धक्कादायक! रेल्वे पुलाखाली अल्पवयीन मुलीवर करायचा लैंगिक अत्याचार…
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fourth list of 7 candidates
Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?
BJP and RSS cannot decide what color is the page of constitution says Nana Patole
संविधानाच्या पृष्ठाचा रंग कोणता हे भाजप, संघ ठरवू शकत नाही; नाना पटोले म्हणतात,‘ भाजपचा जळफळाट कारण…’

तासाभरानंतर पोलीस कोठडीतील आरोपी बेपत्ता असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यापूर्वी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी परीसरात आरोपी इरफानचा शोध घेतला. परंतु, तो मिळून आला नाही. त्यामुळे पोलीस कर्मचारी अडचणीत आले. त्यांनी लगेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन राजकुमार यांना आरोपी फरार झाल्याची माहिती दिली. त्यांनी लगेच डीबी पथकाला सूचना दिल्या आणि वेगवेगळे पथके तयार करुन आरोपी वाहनचोर इरफान अन्सारी याचा शोध घेणे सुरु केले.

आणखी वाचा-अमरावती : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांचा महापूर! सोने, चांदीसह रोकडही…

पोलीस कोठडीतून पसार झालेला आरोपी इरफान अन्सारी तीन तासांच्या शोधमोहिमेनंतर मिळून आला. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु, तोपर्यंत आरोपी पसार झाल्याची घटना पोलीस उपायुक्त रश्मिता राव एन यांच्यापर्यंत पोहचली. त्यांनी लगेच आरोपीला पकडण्यासाठी दिशानिर्देश दिले. आरोपी फरार झाल्याप्रकरणी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अजनीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन राजकुमार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

वाहनचोरीचा आरोपी इरफान अन्सारीवर अजनी पोलिसांनी गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली आहे. आरोपी इरफानला सध्या आम्ही पोलीस कोठडीच्या मागणीसाठी न्यायालयात नेत आहोत. आरोपी पोलिसांच्या कोठडीतून पळाल्याच्या घटनेबाबत मी सध्या काहीही बोलू शकत नाही. आरोपीला न्यायालयात नेण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. या विषयावर सायंकाळी बोलणार आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा-पतीने रागाच्‍या भरात पत्‍नीला मारली लाथ, कडेवरील चिमुकलीचा खाली पडून…

शहरातील सर्वात वादग्रस्त कारभार असलेल्या अजनी पोलीस ठाण्यात आणखी एक विचित्र घटना घडली आहे. एका वाहनचोराला अजनी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करुन अटक केली. मात्र, बुधवारी पहाटेच्या सुमारास आरोपी पोलीस कोठडीतून फरार झाला. त्यामुळे पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. याबाबत वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर पोलिसांचे वेगवेगळे पथक आरोपीचा शोध घेत होते. शेवटी आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इरफान शमशाद अन्सारी (२०, अंबेनगर, पारडी) असे पोलीस कोठडीतून पळालेल्या आरोपीचे नाव आहे.

Story img Loader