स्वयंघोषित समाज माध्यम विश्लेषक अजित पारसे आणि एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मुलाचे ‘संबंध’ समोर आले असून पारसेने त्या युवा नेत्यालाही ‘दिल्ली दर्शन’ घडवल्याची धक्कादायक माहिती आहे. त्यामुळेच पारसेची अटक वारंवार टळत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारसेने राज्यातील एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मुलाशी मैत्री केली व त्याला आपल्या जाळ्यात ओढले. त्याच्या वडिलांच्या राजकीय पदाचा लाभ उचलण्यासाठी पारसेने नेत्याच्या मुलाचा वापर केला. त्याच्यासोबत नेहमी मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या केल्या. त्याला वेगवेगळया ‘व्यसना’ची चटक लावली. तो नेतापुत्रही वडिलांची प्रतिमा मलीन होण्याची चिंता न करता आंबटशौकीन पारसेसोबत दिल्लीला जात होता, दिल्लीतील नियोजित हॉटेलमध्ये मौजमजा करीत होता. पारसेकडे त्या नेतापुत्राचे काही छायाचित्र आणि चित्रफीत असण्याची शक्यता आहे. पारसे त्या नेतापुत्राला ‘एटीएम’सारखा वापरत होता, अशी चर्चा आहे. या नेतापुत्रासोबतच त्याचे काही धनाढ्य मित्रही मुंबई आणि दिल्लीला जात असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: नागपूर: अजित पारसेच्या न्यायालयीन अडचणीत वाढ

मुलाला वाचवण्यासाठी नेत्याचा आटापिटा
‘हनिट्रॅप’साठी कुप्रसिद्ध असलेल्या पारसेच्या जाळ्यात ‘ अडकलेल्या मुलाची प्रतिमा डागाळू नये यासाठी ‘त्या’ नेत्याचा आटापिटा सुरू असल्याचे कळते. मुलाला राजकारणात आणण्यासाठी सज्ज असलेल्या ‘त्या’ नेत्याच्या अडचणीत पारसेच्या अटकेमुळे वाढ होऊ शकते. याच बाबीचा विरोधक राजकीय फायदा घेण्याची शक्यता असल्यानेही ‘त्या’ नेत्याचे झोप उडाल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: नागपूर : तोतया अजित पारसेने घातला वकिलांना गंडा, आमिष दाखवून लाखोंनी फसवणूक

पारसेला नेमका कोणता आजार?
महिन्याभरापासून आजारी असलेल्या महाठग अजित पारसेच्या प्रकृतीत सुधारणाच होत नाही. त्याला असा कोणता गंभीर स्वरूपाचा आजार झाला, हे अद्याप समोर आले नाही. पारसे आपल्या वकिलांशी चर्चा करून अटक टाळण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे कळते. मात्र, पारसेच्या प्रकृतीत सुधारणाच होत नाही, म्हणून अटक करीत नाहीत, असे पोलीस सांगत आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused ait parse arranged delhi darshan for leaders son in nagpur news tmb 01
First published on: 15-11-2022 at 11:47 IST