Premium

दोन्ही खिशात पैसे तर एकाच खिशातील कसे लुटले? पोलिसांचा तर्क अन् बनाव उघड

आरोपी गणेश यास ऑनलाईन लूडो जुगाराचे व्यसन होते.

Accused Ganesh spent money online ludo gambling lied about theft wardha
दोन्ही खिशात पैसे तर एकाच खिशातील कसे लुटले? पोलिसांचा तर्क अन् बनाव उघड (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वर्धा: गॅस सिलेंडरचे वाटप करणारा गणेश गजानन रहाटे याची बनवेगिरी पोलीसांनी शिताफीने उघडकीस आणली. त्याचे स्वतःचे वाहन त्याने श्री गॅस एजेन्सीकडे भाड्याने दिले आहे. घटनेच्या दिवशी तो सींदी ते दहेगाव दरम्यान सिलेंडरचे वाटप करून तो परत जात होता. त्यावेळी त्याच्या पँटच्या दोन्ही खिश्यात त्याने ५५ हजार ३९० रुपये ठेवले होते. मात्र वाटेत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यास मारहाण करीत ३१ हजार ७१० रुपयाची रक्कम हिसकावून नेल्याची तक्रार त्याने दहेगाव पोलीसांकडे केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चौकशीत लगतच्या पाच गावातील सराईत गुन्हेगार तपासण्यात आले. अन्य तपासणी झाली पण कुठेही संशयास्पद दिसून आले नाही.आरोपीने दोन्ही खिश्यात पैसे असल्याचे सांगितले,पण मग एकाच खिशातील पैसे कसे लुटले, या प्रश्नावर आरोपी गडबडला. खोदून चौकशी केल्यावर तो वारंवार बयाण बदलत असल्याचे स्पष्ट झाले. शेवटी पोलिसी हिसका दाखविल्यावर सत्य बाहेर आले.

हेही वाचा… रोजगार हमी योजनेत महिलांचा वाढता सहभाग

आरोपी गणेश यास ऑनलाईन लूडो जुगाराचे व्यसन होते. त्यात २६ हजार रुपये हरल्याची कबुली त्याने दिली. काही खर्च केले तर काही पैशातून उधारी चुकवली, असे त्याने सांगितले. मात्र सिलेंडरची रक्कम मालकाकडे जमा करणे भाग होते. म्हणून त्याने लुटल्याची खोटी तक्रार दिल्याचे निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पो. नि. योगेश कमाले, दीपक वानखेडे, मनोज धात्रक, नरेंद्र पाराशार, संजय बोगा,विनोद कापसे, शिवकुमार परदेशी यांनी ही कारवाई फत्ते केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accused ganesh spent money on online ludo gambling and lied about theft in wardha pmd 64 dvr

First published on: 26-09-2023 at 11:59 IST
Next Story
आनंदवार्ता! मेडिकल रुग्णालयात आता लहान मुलांच्या ‘ॲलर्जी’ची तपासणी