scorecardresearch

Premium

दुहेरी हत्याकांडातील आरोपीने १११ बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून लुबाडले

आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

accused double murder case lured 111 unemployed people jobs
दुहेरी हत्याकांडातील आरोपीने १११ बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून लुबाडले (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर: व्यापाऱ्यांच्या दुहेरी हत्याकांडातील एक आरोपी ओंकार तलमलेवर १११ तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून ५.३१ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ओंकार आणि अश्विन वानखेडे हे दोघेही ढोलताशा पथकामध्ये असल्यामुळे एकमेकांना ओळखत होते. ओंकारने तो नासामध्ये कनिष्ठ वैज्ञानिक या पदावर कार्यरत असल्याचे अश्विनला सांगितले. सध्या नागपुरातील रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर येथे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून ते भरायचे असल्याचे त्याने अश्विनला सांगितले.

Nirmala Sitharaman asserted that the government has succeeded in delivering social schemes to the intended beneficiaries
सामाजिक योजना इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात सरकारला यश – सीतारामन
20 vacant air India buildings demolished by airport administration despite residents oppose
एअर इंडियाच्या रिकाम्या वीस इमारती पाडल्या; रहिवाशांचा विरोध असतानाही विमानतळ प्रशासनाकडून पाडकाम
online Fraud with a person
अमरावती : इंदिरा-सेस ॲप डाऊनलोड केले आणि पाहता पाहता ८४ लाख गमावले…
Mumbai Highcourt
“मग मुंबईचे रस्ते बंद करावेत का?”, कर्मचाऱ्यांना मराठा आरक्षण सर्वेक्षणात जुंपल्याने HC ने मुंबई पालिकेला फटकारले

हेही वाचा… नागपूर : थेट उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीतच गडकरींनी सादर केले राष्ट्रसंताचे ‘ते’ प्रसिद्ध भजन

संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख असून तेथे नोकरी लावून देणे शक्य असल्याचे आमिष दाखवले. त्यासाठी २ लाख रुपये भरावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. हे पैसे आरोपीने त्याच्या बँक खात्यात भरायला सांगितले. आणखी कुणी नातेवाईक-मित्र असल्यास त्यांनाही नोकरी लावून देण्याचे सांगून एकूण १११ बेरोजगारांकडून तब्बल ५ कोटी ३१ लाख ७० हजार रुपये विविध पद्धतीने घेतले.

हेही वाचा… चंद्रपूर : एसएनडीटी महिला विद्यापीठासाठी ५० एकर जमीन प्रदान, सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

दरम्यान, नोकरी लागत नसल्याने अश्विनने संबंधित कार्यालयात जाऊन विचारणा केली असता या पद्धतीने कोणतेही ऑफिस स्टाफ घेतले जात नसून आपली फसवणूक झाल्याचे कळले. त्यानंतर त्याने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

ई-मेलवर खोटे नियुक्तीपत्र

ओंकारने अनेक बेरोजगारांकडून २ लाख रुपये उकळून त्यांच्या ई-मेलवर रिजनल रिमोट सेंन्सिग, वाडीच्या नावाने खोटे नियुक्ती पत्र पाठवल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. हे पत्र बनावट असल्याचे नंतर उघड झाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accused in double murder case lured 111 unemployed people with jobs mnb 82 dvr

First published on: 05-08-2023 at 12:02 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×