बॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ;  पिस्तूल आणि काडतूस जप्त

बिहार मधील भागलपूर न्यायालयात आरोपी तनवीर ला  १७ मे ला बिहार पोलिस घेऊन जात असताना त्याने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला होता

प्रतिनिधिक छायाचित्र

नागपूर : बिहार मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला नागपूर पोलिसांनी अटक केली आरोपीकडून एक पिस्तूल आणि दोन काडतूस जप्त करण्यात आले.मो. तनवीर मो. मंजूर (32) असे आरोपीचे नाव आहे. बिहार मधील भागलपूर न्यायालयात आरोपी तनवीर ला  १७ मे ला बिहार पोलिस घेऊन जात असताना त्याने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला होता. तेथून तो थेट कोलकत्ता येथे गेला. त्यानंतर तो नागपुरात आला. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानखेडा परिसरात तो भाड्याने राहत होता. तहसील पोलिसांना माहिती मिळताच आज सायंकाळी आरोपीला अटक करण्यात आली.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accused of bihar bomb blast arrested in nagpur zws

Next Story
‘बुलेट’धारकांच्या ‘फटाक्यां’मुळे नागरिक हैराण ; वृद्ध, रुग्ण, पादचाऱ्यांना आवाजाचा त्रास
फोटो गॅलरी