चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हा व्याघ्र जिल्हा म्हणून ओळखला जातो. सेलिब्रेटींना येथील वाघांची भुरळ पडली आहे. राज्याचे माजी वनमंत्री व बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडन हिला बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील कारवा येथे जंगल सफारी घडविली.या दरम्यान रविना टंडनला इरिना वाघिणीचे दर्शन घडले. ही सफारी रविवारी घडल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी दिली.
माजी वन मंत्री मुनगंटीवार यांच्यासोबत रविवारी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री रविना टंडन जंगल सफारी करण्यासाठी कारवा येथे आल्या. त्यांनी स्वतःच्या वाहनातून सफारी चा आनंद लुटला. जंगल पर्यटन करत असताना, त्यांना इरिना वाघिणीनचे दर्शन घडले. जंगल पर्यटन झाल्यावर त्यांनी वाघाबाबत वन अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे व अन्य अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढून कारवा जंगल सफारी ची आठवण सदैव स्मरणात राहील, असा अभिप्राय दिला.