शनिवारी तब्बल १७ स्वाईन फ्लूग्रस्तांची भर पडल्याने चिंता वाढली आहे. सर्वाधिक रुग्ण हे नागपूर शहरातील आहेत.जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत आढळलेल्या नवीन स्वाईन फ्लूग्रस्तांमध्ये शहरातील १२ तर ग्रामीणच्या ५ रुग्णांचा समावेश आहे. नवीन रुग्णांमुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ९९ वर तर ग्रामीणला ६७ अशी एकूण १६६ रुग्णांवर पोहचली आहे.

जिल्ह्यात या आजाराचे झपाट्याने वाढते संक्रमण बघता नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणतीही लक्षणे आढळल्यास संबंधित रुग्णांनी चाचणी करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केले जात आहे. सध्या स्वाईइन फ्लू प्रतिबंधासाठी आवश्यक लशी उपलब्ध झाल्या आहेत. लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सध्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही महापालिकेचे साथरोग विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी केले आहे.