scorecardresearch

Premium

शेतकऱ्यांना दिलासा… पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात

बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आपदग्रस्त  पन्नास लाख शेतकऱ्यांना  दिलासा मिळणार आहे.

Advance crop insurance amount has started to be deposited in the accounts of farmers across the state including Buldhana district
शेतकऱ्यांना दिलासा… पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आपदग्रस्त  पन्नास लाख शेतकऱ्यांना  दिलासा मिळणार आहे.राज्यात ४९ लाख ५ हजार ०३२  शेतकऱ्यांना २,०८६ कोटी ५४ लक्ष रुपये अग्रीम पीकविमा म्हणून मंजूर झाले आहे. त्याचे वाटप  चालू  झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ३६,३५८ शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा म्हणून १८ कोटी ३९ लाख रुपये  मंजूर झाले  आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

यापूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यव्यापी एल्गार आंदोलन पुकारले होते. बुलढाण्यात ‘एल्गार महामोर्चा,  अन्नत्याग आंदोलन केल्यावर  २८ नोव्हेंबर रोजी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी  शेतकऱ्यांनी  मुंबईत  धडक दिली होती. दरम्यान २९ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविकांत तुपकरांच्या  मागण्यांबाबत बैठक झाली. सह्यांद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्यात हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांच्या  खात्यात अग्रीम पिकविम्याची रक्कम जमा करण्याच्या मागणीचाही समावेश होता. त्यानुसार  शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम पिकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

AJIT PAWAR AND BUDGET
सौर कृषीपंप ते कृषी महाविद्यालयास मान्यता, अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? वाचा…
farmers agitation causes massive traffic jam in nashik city
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिककरांची कोंडी; वन जमिनींच्या प्रश्नावर मंगळवारी मुंबईत बैठक
Allegation of the farmers association of abuse of onion producers
कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप; निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षाच
Compensation decision of sugarcane growers Only eight factories are ready to pay after the agitation
ऊस उत्पादकांच्या भरपाई निर्णयास कारखान्यांकडून केराची टोपली; आंदोलनानंतर केवळ आठ कारखान्यांकडून रक्कम देण्याची तयारी

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Advance crop insurance amount has started to be deposited in the accounts of farmers across the state including buldhana district scm 61 amy

First published on: 06-12-2023 at 12:15 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×