महाधिवक्ता कुंभकोणी यांची भूमिका तपासावी

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये महाधिवक्ता होते आणि महाविकास आघाडी सरकारमध्येही तेच कायम आहेत.

Final decision on OBC reservation next Friday Nana Patole

नाना पटोले यांची मागणी

नागपूर : अनेक महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात न्यायालयाचे निकाल जात असल्याने यामागची कारणे शोधण्याची गरज उद्भवली आहे. त्यामुळे राज्याच्या महाधिवक्त्यांच्या भूमिकेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे महाधिवक्ता (अ‍ॅडव्होकेट जनरल) आशुतोष कुंभकोणी यांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला. रविवारी नागपुरात प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकारांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणप्रकरणी कायदेशीर सल्ला देतानाच चूक झाली काय, असे विचारण्यात आले. त्यावर पटोले म्हणाले की, राज्य सरकार अनेक खटले हरत आहेत. त्यामुळे कुंभकोणी यांची भूमिका तपासण्यात यावी आणि त्यांच्याबद्दल फेरविचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे काँग्रेस पक्ष करणार आहे. कारण, ते देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये महाधिवक्ता होते आणि महाविकास आघाडी सरकारमध्येही तेच कायम आहेत. ते  राज्य सरकारचे अनेक खटले हरत आहेत. त्याची नेमकी कारणे काय ते तपासावे लागणार आहे.

राज्य सरकारने याचिका दाखल करावी

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केंद्राकडून ओबीसींच्या जनगणनेची माहिती मागावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येईल, असेही पटोले म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबवल्या जाऊ शकत नाहीत, असा आदेश शनिवारी दिला होता. पटोले म्हणाले,  हा केवळ पाच जिल्ह्यांचा प्रश्न नव्हे तर संपूर्ण देशातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न आहे. पुढील सर्व निवडणुका ओबीसी आरक्षण कायम ठेवून घ्याव्यात, असेही ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Advocate general at the press conference legal advice on obc reservation in local bodies akp

ताज्या बातम्या