लोकसत्ता टीम

चंद्रपूर : जगभरात तांडव माजवणारी आफ्रिकन जायंट स्नेल (गोगलगाय) ब्रम्हपुरीतील शेषनगर परिसरात आढळून आल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये कमालीची चिंता व्यक्त केली जात आहे. ब्रम्हपुरीतील वन्यजीव अभ्यासक तथा झूलॉजिस्ट प्रा. ललित उरकुडे यांना ही गोंगलगाय शेषनगरच्या मुख्य रस्त्यावर १२ ऑगस्ट रोजी आढळून आली.

Rivers all over the world were drained
जगभरातील नद्यांचे नाले झाले, कारण…
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Smoke biscuit injurious to heart observation in krims hospital study
नागपूर: नवीन ‘फॅड’! तोंडातून धूर सोडणारी बिस्किटे…
2nd October Gandhi Jayanti Physical Mental Violence Religion
बदलतं जग आणि महात्मा
elephant census
UPSC Key : यूपीएससी सूत्र : भारतातील हत्ती गणना होणारा विलंब अन् नामिबियामध्ये ७०० प्राण्यांच्या कत्तलीचे आदेश, वाचा सविस्तर…
construction in natural drain in badlapur ignore by national green arbitration
बदलापुरातही नैसर्गिक नाल्यात बांधकाम; राष्ट्रीय हरित लवादाच्या भूमिकेनंतर बांधकामावर प्रश्नचिन्ह
animal meet tirupati laddu marathi news
तिरुपतीमधील लाडू वाद चिघळला
pistol smuggler arrested with four others in Pimpri Chinchwad
पिंपरी- चिंचवड: पिस्तुलं विक्री करणारा डीलर पोलिसांच्या जाळ्यात; ७ पिस्तूल १४ जिवंत काडतुसे जप्त

अर्थ कंजरवेशन संस्थेचे सदस्य ईशान वठे, चेतन राखडे, भूपेश राखडे, आर्यन राखडे, श्रीगणेश बुराडे यांच्या मदतीने सतत दोन रात्र लगतच्या परिसरात शोध घेण्यात आले. या शोध मोहिमेत एकूण सहा स्नेल (गोगलगाय) आढळून आल्यावर त्यांना मिठाच्या व कपडे धुण्याचे पावडरच्या पाण्यात टाकून संपवण्यात आले. या गोगलगाय जगभरातील अनेक देशात धोकादायक घोषित करण्यात आले आहे. या प्रजातीने केरळ राज्यातील अनेक जिल्ह्यात थैमान घातले आहे. दरवर्षी करोडो रुपयांची शेती व फळबागा या गोंगलगाई खाऊन फस्त करत आहेत. त्यामुळे यांना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत करोडोंचा खर्च केलेला आहे. ही प्रजाती विदर्भात नागपूर शहर, नवेगाव बांध व वडसा येथे आढळून येत आहेत.

आणखी वाचा-चंद्रपूर : खासदार प्रणिती शिंदे म्हणतात, ‘विरोधी पक्ष नेता आमचा मुख्यमंत्री…’

या गोगलगाई १८४७ मध्ये भारतात इंग्राजांद्वारे स्वतःच्या खाण्यासाठी अन्न व बागेत पाळीव प्राणी म्हणून आणण्यात आले होते. ही प्रजाती भारतीय पर्यावरणासाठी अत्यंत धोकादायक असून यांच्या विष्टेपासून वनस्पतींवार विविध रोग पसरतात. तसेच मानवांना मेंदुज्वर सारखे रोग होण्याचा धोका असतो. ही गोगलगाय एक ते सव्वा किलो पर्यंत वजनात वाढू शकते व एका पावसाळ्यात अंतराने एकूण ८०० ते १२०० अंडे देण्यास सक्षम असते. -प्रा. ललित उरकुडे, वन्यजीव अभ्यासक, ब्रम्हपुरी

जायंट आफ्रिकन गोगलगाय (लिसाचलिना फुलिका) ही सर्वात हानीकारक प्रजातीपैकी एक प्रजाती आहे. ही ५०० पेक्षा जास्त प्रकारची पिके आणि शोभेच्या वनस्पती खाण्यासाठी ओळखले जाते. ही गोगलगाय इतर प्राणी आणि लोकांसाठी गंभीर धोका आहे, परजीवी (रोग निर्माण करणारे जीव) प्रसारित करण्यास जबाबदार आहे. या धोकादायक महाकाय आफ्रिकन गोगलगायीला पिकांचे आणि प्राण्यांच्या जीवनाचे नुकसान होण्यापासून नियंत्रित करण्यासाठी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. -डॉ. गोपाल पालीवाल, सदस्य, प्राणी तज्ज्ञ समिती, राज्य जैवविविधता मंडळ, महाराष्ट्र राज्य.