Premium

नागपूर : ब्रेकअपनंतर प्रेयसीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; प्रियकरावर गुन्हा दाखल

इंस्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या प्रेमी युगुलाचे ‘ब्रेक अप’ झाले. मात्र, युवकाने आता प्रेयसीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

threat to spread photos
नागपूर : ब्रेकअपनंतर प्रेयसीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; प्रियकरावर गुन्हा दाखल (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : इंस्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या प्रेमी युगुलाचे ‘ब्रेक अप’ झाले. मात्र, युवकाने आता प्रेयसीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तिच्याशी घरात घुसून अश्लील चाळे केले. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. शुभम शेंडे (वय २७) रा. साईबाबनगर, खरबी असे आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्वर परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय फिर्यादीची १४ वर्षीय मुलगी आठव्या वर्गात शिकते. तिची २६ नोव्हेंबर ते २७ मे २०२३ या दरम्यान आरोपी शुभमशी ओळख झाली. या ओळखीतून आरोपी मुलीसोबत मोबाईलवर बोलत होता. दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही एकमेकांना नियमित भेटायला लागले. प्रेमसंबंध वाढल्यानंतर शुभमने तिच्यासोबत काही छायाचित्र काढले होते. काही दिवसांपासून दोघांत कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. तिने शुभमशी बोलण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे तो चिडला आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. तिचा पाठलाग करू लागला. याचदरम्यान शुभम तिच्या घरी गेला. तिला फिरायला सोबत नेण्यासाठी हट्ट करीत होता. मात्र, त्याला ती नकार देत होती. त्यामुळे चिडलेल्या शुभमने तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी अश्लील चाळे करीत विनयभंगही केला. तिने आईला सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे शुभमने तिला काही अश्लील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली.

हेही वाचा – वाशीम: कुटुंबातील तीन भावंडांनी जिद्दीने मिळविले यश; पोलीस होण्याचे स्वप्न साकार, आई-वडिलांच्या कष्टाचे चीज

घाबरलेल्या मुलीने रात्री आई घरी आल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 12:33 IST
Next Story
वाशीम: कुटुंबातील तीन भावंडांनी जिद्दीने मिळविले यश; पोलीस होण्याचे स्वप्न साकार, आई-वडिलांच्या कष्टाचे चीज