नागपूर : करोनानंतर सोन्याचे दर विक्रमी उंचीवर गेले होते. त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दरम्यान दर घसरले. परंतु भारत- पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीनंतर पुन्हा दर वाढायला सुरवात झाली होती. परंतु आता सोन्याचे दर घसरतांना दिसत आहे. १३ मे रोजीच्या तुलनेत १५ मे रोजी सोने- चांदीचे दर निच्चांकीवर आले आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने व चांदीचे दागिने खरेदीची आता सुवर्णसंधी असल्याचा सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.

जम्मू कश्मिरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान व दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले. आता दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीनंतर तणाव निवळत आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात १३ मे २०२५ रोजी सोन्याचे दर मेकिंग आणि जीएसटी शुल्क वगळून प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९४ हजार ६०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८८ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६१ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. हे दर १५ मे २०२५ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्राम ९२ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८५ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५९ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. हे दर मागील काही महिन्यांतील दर बघितल्यास निच्चांकीवर असल्याचे चित्र आहे. दरम्यान सोन्याचे दर येत्या काळात आणखी वाढण्याचे संकेत सरापा व्यवसायिक देत आहे. त्यामुळे ही नागरिकांना सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी असल्याचा सराफा व्यवसायिकांचा दावा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसांत सोने- चांदीचे दर कितीने घटले…

नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर १३ मे २०२५ रोजीच्या तुलनेत १२ मे २०२५ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम २ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी २ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी २ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार ६०० रुपये घसरल्याचे दिसत आहे. तर चांदीचे दर १३ मे रोजी प्रति किलो ९७ हजार ८०० रुपये होते. हे दर १५ मे रोजी ९४ हजार ८०० नोंदवले गेले. त्यामुळे चांदीचे दर ३ हजार रुपये प्रति किलोने घसरले आहे.