After coming home school little girl went out to play Police officer find gril Nagpur news ysh 95 | Loksatta

भंडारा: शाळेतून घरी आल्यावर चिमुकली खेळण्याकरिता बाहेर गेली आणि…

खेळण्यासाठी घराबाहेर गेलेली आठ वर्षीय चिमुकली २४ तास लोटूनही परत आली नसल्याची खळबळजनक घटना पापडाखुर्द येथे आज उघडकीस आली.

भंडारा: शाळेतून घरी आल्यावर चिमुकली खेळण्याकरिता बाहेर गेली आणि…
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

भंडारा: खेळण्यासाठी घराबाहेर गेलेली आठ वर्षीय चिमुकली २४ तास लोटूनही परत आली नसल्याची खळबळजनक घटना पापडाखुर्द येथे आज उघडकीस आली. हिंस्त्र पशूचा हल्ला, अपघात किंवा घातपात, अशा विविध चर्चांना उधाण आले असून आज सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी तसेच इतर पोलीस अधिकारी या गावात दाखल झाले आणि ताबडतोब शोध मोहीम सुरू केली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : शिंदे सरकारचा भाजपाच्या सरकारकडे जाणूनबुजून कानाडोळा, राऊतांचा आरोप; राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात सानगडीजवळील पापडाखुर्द गावातील साडेआठ वर्षीय चिमुकली काल सायंकाळपासून बेपत्ता आहे. जि.प. प्राथमिक शाळा पापडाखुर्द येथे ती इयत्ता तिसरीत शिकत होती. शाळेतून घरी आल्यावर ती खेळण्याकरिता बाहेर गेली. मात्र, काळोख पडून गेल्यावरही लेक घरी न परतल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी रात्रभर शोधाशोध केली. गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस विभागाला याबाबत माहिती दिली. अद्याप या मुलीचा कुठेही शोध लागला नसून कोणत्याही प्रकारचे धागेदोरे हाती आलेले नसल्याचे पोलीस अधीक्षक मतानी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 17:02 IST
Next Story
नागपूरात पुढील तीन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद