scorecardresearch

Premium

उपराजधानीतील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये अचानक वाहनांच्या रांगा..!!

तीन दिवसांपूर्वीच्या या महाप्रलयाचा कोप ओसरला असला तरी आता यातून सावरता सावरता नागरिकांची पुरेवाट होत आहे.

after flood queues of vehicles at servicing centers
पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी वाहनांच्या दुरुस्तीसाठी शहरातच्या वेगवेगळ्या सर्व्हीस सेंटरमध्ये रांगा लावल्या आहेत.(फोटो- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नागपूर : सर्व्हिसिंग सेंटरमध्ये वाहने सर्व्हिसिंगसाठी जातात, पण उपराजधानीत असे काय झाले, की अचानक या सेंटरमधील वाहनांच्या रांगा वाढल्या! शुक्रवारी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने वाहनधारकांवर ही वेळ आणली.

signal failure, churchgate station, morning, western railway, local services, mumbai central
पश्चिम रेल्वेच्या ‘प्रवासी सुरक्षा’ मोहिमेत ६७४ जणांना अटक
APMC, stalls shopkeepers continue footpaths marginal space
एपीएमसी मध्ये दुकानधारकांचे बस्तान फुटपाथवर सुरूच
stray dogs in badlapur, badlapur municipal council, sterilization of stray dogs
भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी कंत्राटदार मिळेना, बदलापुरात पालिकेकडून निविदेला मुदतवाढ, भटके श्वान वाढले
Maratha Kranti Morcha Buldhana
बुलढाणा : मराठा क्रांती मोर्चासाठी पोलिसांचा बंदोबस्तरुपी चक्रव्यूह, कॅमेराची करडी नजर, दंगा काबू पथक सज्ज

तीन दिवसांपूर्वीच्या या महाप्रलयाचा कोप ओसरला असला तरी आता यातून सावरता सावरता नागरिकांची पुरेवाट होत आहे. मध्यरात्रीच्या या प्रलयामुळे नागरिकांना त्यावेळी सावरण्याची संधी दिली नाही आणि घरासमोर, कार्यालयासमोर, रस्त्यावर तसेच वाहनतळात असलेली वाहने या प्रलयाच्या तडाख्यात सापडली. याचा फटका सुमारे ५००हून अधिक वाहनांना बसला. काही वाहने एकमेकांना आदळल्यामुळे हानी झाली, तर काही वाहने अर्धवट तर काही वाहने पूर्णपणे पाण्याखाली आली.

आणखी वाचा-नागपूर: नाल्यांमधील अडथळ्यांकडे वेळीच लक्ष दिले असते तर…

आता पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी वाहनांच्या दुरुस्तीसाठी शहरातच्या वेगवेगळ्या सर्व्हीस सेंटरमध्ये रांगा लावल्या आहेत. प्रत्येकाला त्याचे वाहन तातडीने दुरुस्त करुन हवे आहे. मात्र, पाणी असतानाच काहींनी वाहने सुरु करुन पाहील्याने झालेले नुकसान अधिक आहे, तर त्यांनी वाहने सुरु करुन पाहण्याचा प्रयत्न न करता ती दुरुस्तीला दिली, त्यांचा खर्च तुलनेने बराच कमी आहे. वाहनदुरुस्तीसाठी सातत्याने येणाऱ्या कॉलमुळे सर्व्हिसिंग सेंटरमध्येही जागा नसल्याने अनेकांना वाट पाहावी लागत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: After flood queues of vehicles at servicing centers in nagpur rgc 76 mrj

First published on: 26-09-2023 at 15:47 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×