महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विरोधात शेकडो कृषी पदवीधरांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर सोमवारी दुपारी ‘थाली बजाओ’ आंदोलन केले. गत १३ दिवसांपासून सलग कृषी अभियंत्यांचे आंदोलन सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>नागपूर : मोदी सरकारविरोधात कॉंग्रेसचे एलआयसी, एसबीआयसमोर निदर्शने

आयोगाने कृषी सेवा परीक्षेच्या अभ्यासक्रमात बदल केला असून कृषी अभियांत्रिकीचे केवळ गुण १६ ठेवण्यात आले आहेत. कृषी अभियांत्रिकीवर हा अन्याय असल्याचा आरोप करून राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील सुमारे अडीच हजार कृषी अभियंत्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. नवीन अभ्यासक्रमात पेपर एक सामान्य कृषी आणि पेपर दोन कृषी विज्ञान व तंत्रज्ञान आहे. त्यात पेपर दोनमध्ये कृषी अभियांत्रिकीच्या उमेदवारांवर अन्याय झाल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. तो दूर न करता आयोगामार्फत दोन जाहिराती काढून पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जुन्या पद्धतीनेच अभ्यासक्रम ठेवण्यात यावा व पदभरती स्थगित करण्यात यावी, या मागण्यांसाठी कृषी अभियंत्यांनी गत १३ दिवसांपासून राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आंदोलन सुरू केले आहे.

हेही वाचा >>>“आंदोलन कशाला करता, देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन…”, प्रविण तोगडीयांचा खोचक टोला

दरम्यान, सोमवारी दुपारी कृषी अभियंत्यांनी ‘थाली बजाओ’ आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मागण्यांसाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, १३ दिवसानंतरही कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शासन, प्रशासन, आणि आयोगाला जागे करण्यासाठी आंदोलकांनी आज ‘थाली बजाओ’ आंदोलन केले. शासनाकडून निर्णय होत नसल्यामुळे आंदोलकांनी संताप व्यक्त केला असून मागण्या मान्य होऊन आयोग व शासन लेखी स्वरुपात हमी देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका कृषी अभियंत्यांनी घेतली आहे.

प्रा. अंजली आंबेडकरांनी घेतली आंदोलकांची भेट
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकर यांनी विद्यापीठ परिसरात आंदोलन करणाऱ्या कृषी अभियंत्यांची भेट घेतली. आंदोलकांच्या मागण्या त्यांनी समजून घेतल्या व आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. मागण्या पूर्ण होण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation of agricultural engineers against public service commission ppd 88 amy
First published on: 06-02-2023 at 18:25 IST