स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन संसदेपर्यंत घेऊन जाणार, असे अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी स्पष्ट केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीने महात्मा गांधी जयंती दिनी शहीद चौक, विदर्भ चंडिका मंदिरासमोर, इतवारी, नागपूर येथे ‘आत्मक्लेश आंदोलन’ करण्यात आले. यावेळी आत्मक्लेश आंदोलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नागपूर : प्राध्यापक पदभरतीसाठी ‘भीक मांगो’ आंदोलन

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ‘मिशन २०२३ अंतर्गत विदर्भ राज्य मिळवू औंदा’ म्हणून आंदोलनाची मालिका सुरु झालेली आहे. आत्मक्लेश आंदोलनातून केंद्र सरकारने विदर्भाचे राज्य त्वरित निर्माण करावे, अन्नधान्यावर केंद्र सरकारने लावलेली ‘जीएसटी’ तत्काळ मागे घ्यावी, वाढवलेले विजेचे दर तात्काळ मागे घ्यावे, अतिवृष्टी व ढगफुटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने त्यांना प्रति हेक्टरी ७५ हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.

हेही वाचा- यवतमाळ : देशाची वाटचाल विनाशाकडे; अर्थतज्ज्ञ प्रा. देसरडा यांची टीका

विदर्भातील जनतेला न विचारता महाराष्ट्रात सामील करून घेतले, परंतु त्यांचे हक्क पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी हिरावून घेतले. आता अन्यायाची मालिका पुरेशी झाली असून विदर्भाची जनता आता महाराष्ट्रात रहायलाच तयार नाही. विदर्भ राज्य मिळवण्यासाठी आरपारच्या संघर्षातून जावे लागेल तरीही आम्ही सर्व तयार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी आत्मक्लेश आंदोलनाचे संचालन वाहतूक आघाडी अध्यक्ष प्रशांत जयकुमार यांनी केले, तसेच विदर्भ प्रदेश युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, नागपूर जिल्हा महिला अध्यक्षा सुधा पावडे, कोअर कमेटी सदस्य प्रभाकर कोंडबत्तूनवार, अविनाश काकडे, ज्योती खांडेकर, ऋत्तीका डफ यांची भाषणे झाले.

हेही वाचा- नागपूर : स्मार्ट सिटीच्या कामातून ‘शापूरजी’ला वगळले; कामात दिरंगाई भोवली

विदर्भाचे राज्य निर्माण करण्यासाठी देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटून संसदेच्या दोन्ही बाकांवर विदर्भ राज्याची मागणी केली जाईल. खरं तर आत्मक्लेश सरकारनेच करावे कारण त्यांनी दिलेले आश्वासने पाळलीच नाही, असे डॉ. खांदेवाले म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation of vidarbha state movement committee on the occasion of mahatma gandhi jayanti in nagpur dpj
First published on: 03-10-2022 at 09:56 IST