शेतकरी आणि त्यांच्या समस्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांच्या सूचनेनुसार राज्याच्या कृषी धोरणात बदल करण्याची तयारी आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि ॲग्रो व्हिजन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वनमाती सभागृहात रविवारी ड्रोन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. सत्तार म्हणाले, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी अभ्यास केला जात आहे. तो १०० दिवसात पूर्ण केला जाईल.

गडकरी यांची शेतकऱ्यांना सक्षम करण्याबद्दलची तळमळ आपण बघितली आहे. त्यांचा अभ्यास या क्षेत्रातील दांडगा आहे. कृषी धोरणात बदल करताना त्यांच्या सूचनांचा विचार केला जाईल. त्यासाठी त्यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट मागितली आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्र्यांच्या नावाने योजना सुरू करण्याचे विचाराधीन आहे, असेही ते म्हणाले. आमच्या गावाला रस्ता नव्हता. नितीन गडकरी माझ्या मतदारसंघात आले आणि रस्ता बांधण्यासाठी घोषणा केली. त्यांच्यामुळे अजिंठा, वेरुळच्या लेणीकडे जाणाऱ्या रस्त्यांचे काम झाले. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याला, तालुक्याला चांगल्या रस्त्याने जोडण्याचे काम त्यांनी केले.

Freedom of press, right to dignity,
वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय
former MLA Ulhas Pawar
अफवा पसरविण्यात रा. स्व. संघ वस्ताद; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/04/cats_ee077e.jpg
“हा नवा भारत आहे, घुसून मारतो”, योगींचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता फटाके फुटले तरी…”
Dispute over seat allocation in Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीत जागावाटपावरून रुसवेफुगवे

हेही वाचा : नागपुरात सकाळपासूनच मुसळधार पावसाची हजेरी

त्यांच्या कार्याबद्दल बोलण्यासारखे भरपूर आहे, असेही सत्तार म्हणाले. सर्व विद्यापीठात आणि कृषी विभागाने डिझेल-पेट्रोलवर चालणारी वाहने खरेदी करणे बंद करावे. त्याऐवजी वीज, इथेनॉल, एलएनजी, बॉयो सीएनजी, ग्रीन हॅड्रोजन यावर चालणारी वाहने वापरली गेली पाहिजे. यामुळे प्रदूषण कमी होईल. सोबतच पेट्रोल-डिझेलची १५ लाख कोटी रुपयांची आयात कमी होईल.

हेही वाचा : ‘डिजिटल इंडिया’त ३० टक्के ग्रामपंचायतींनाच ‘नेट’जोडणी; महाराष्ट्राचे प्रमाण ४४ टक्के

शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर चालणारी चारचाकी (कार) येत्या २८ सप्टेंबरला दिल्लीत आपण चालवणार आहे. सध्या मी विजेवर चालणाऱ्या वाहनातून फिरतो. सगळ्या पेट्रोल आणि डिझेलचे वाहन न वापरता शेतकऱ्यांनी बनलेल्या इंधनावर चालणारे वाहन वापरण्याचा निर्धार घ्यायला हवा. ड्रोन देखील इथेनॉलवर चालवण्याचे प्रयोग सुरू आहेत, असेही गडकरी म्हणाले.