नागपूर : एअर इंडियाने नागपूर येथून मुंबई आणि दिल्ली शहरासाठी असलेली विमानसेवा २९ ऑक्टोबर पर्यंत बंद केली. परिणामी नियमित प्रवाशांना अडचण निर्माण झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एअर इंडिया एअरलाइन्सने नागपूर येथून  दिल्ली ते नागपूर, नागपूर दिल्ली तसेच मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई या चार विमानसेवा रद्द करण्यात आल्या.ऑपरेशनल कारणांसाठी हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात २० ऑक्टोबरला फेरआढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर पुढील रणनीती ठरवण्याची येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या नागपूर येथून मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद आणि इंदूर या विमान सेवा उपलब्ध आहेत. नागपूर येथून चेन्नई आणि कोलकत्ता ही विमान सेवा देखील बंद करण्यात आली आहे. प्रवाशांची पुरेशी संख्या नसल्याने  या दोन्ही सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Air india delhi mumbai service suspended airlines difficulty passengers ysh
First published on: 08-08-2022 at 13:24 IST