अकोला : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अनेक प्रश्न केले. या प्रकरणी आज आमदार अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांच्यावर निशाणा साधला. नावाचा उल्लेख न करता छायाचित्र वापरून त्यांनी हे महाशय गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित केला.
या सर्व प्रकरणावर महाराष्ट्राचा दुर्लक्ष होतंय का? असे देखील मिटकरी म्हणाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. या सर्व घटनेवर आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अनेक मुद्दे उपस्थित केले. संशयाचे काहूर निर्माण झाले.
या विमान अपघात प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आमदार अमोल मिटकरी चौकशीवर असमाधान व्यक्त केले. त्यांनी ‘डीजीसीए’वरही गंभीर आरोप केले आहेत. आता अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या कार्यकाळात राष्ट्रवादीचे ‘पी.आर.’चे काम बघणाऱ्या नरेश अरोरा यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“त्यांचा शोध महाराष्ट्राने घेतलाच पाहिजे” असे का म्हणाले अमोल मिटकरी?
अमोल मिटकरी म्हणाले, ‘‘अजितदादांच्या विमान अपघात दुर्घटनेनंतर सध्या हे महाशय कुठ आहेत? यांच्याकडे महाराष्ट्राच दुर्लक्ष होतंय का? कारण त्यांचे विचार ऐकून आता त्यांचा शोध महाराष्ट्राने घ्यायलाच पाहिजे.’’
“अधिवेशनात चर्चा न होणे वेदनादायी”
अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा देखील होत नसल्याची खंत आमदार अमाेल मिटकरी यांनी व्यक्त केली. घातपात की अपघात? याची अधिवेशनात चर्चा न होणे वेदनादायी व चिंताजनक आहे. राजकारण खरचं वंगाळ असतं, हे दादांचे शब्द खरे ठरलेत, अशी उद्विग्न भावनाही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली.
या विमान अपघात प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आमदार अमोल मिटकरी चौकशीवर असमाधान व्यक्त केले. अजितदादा पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात. मात्र, त्यावर अद्यापही उत्तर मिळालेले नाही. अजितदादा पवार असताना पक्षाच्या पी.आर.चे काम पाहणारे विमान अपघात प्रकरणानंतर साधे दिसलेही नाहीत, असे अमोल मिटकरी म्हणाले.
