scorecardresearch

Premium

अकोला भाजपाची जम्बो कार्यकारिणी जाहीर, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समतोल राखण्याचा प्रयत्न

भारतीय जनता पक्षाची जम्बो महानगर व जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. विविध समाज घटकांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला.

Akola BJP jumbo executive
अकोला भाजपाची जम्बो कार्यकारिणी जाहीर, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समतोल राखण्याचा प्रयत्न (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

अकोला : भारतीय जनता पक्षाची जम्बो महानगर व जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. विविध समाज घटकांचा कार्यकारिणीत समावेश करून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे.

भाजपाच्या जिल्हा व महानगर कार्यकारिणीची प्रतीक्षा लागली होती. अखेर भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी जिल्हा, तर महानगराध्यक्ष जयंत मसने यांनी महानगर कार्यकारिणी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार संजय धोत्रे, प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, विजय अग्रवाल, तेजराव थोरात यांच्या मार्गदर्शनात त्यांच्याशी चर्चा करून कार्यकारिणीचे गठण केले.

vinod tawade
विरोधकांकडे असलेले मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ – विनोद तावडे
youth congress protest in chandrapur, youth congress shivani wadettiwar chandrapur, congress leader vijay wadettiwar
चंद्रपूर महापालिका प्रशासनाच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन
Swarda Bapat in the Executive Committee
पुणे शहर भाजपची कार्यकारिणी जाहीर; गिरीश बापट यांची स्नुषा स्वरदा बापट यांना कार्यकारिणीत स्थान
ganesh mandal in maharashtra
गणेश मंडळांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता पाच वर्षांसाठी एकदाच…

हेही वाचा – कडू स्पष्टच म्हणाले, तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही, कूछ भी नही बदला

हेही वाचा – अंबादास दानवे म्हणतात, महानिर्मितीने काम दिलेल्या कोल वाॅशरिजच्या अर्थकारणात सत्ता पक्षातील नेत्यांचा वाटा…

जिल्हा कार्यकारिणीमध्ये ९२ जणांचा समावेश असून त्यात आदिवासी, ओबीसी, महिला, डॉक्टर, १८ पगड जाती, १२ बलुतेदार यांचा समावेश आहे. त्यात चार सरचिटणीस, दहा उपाध्यक्ष, दहा सचिव आहेत. महानगर कार्यकारिणीमध्ये चार सरचिटणीस, दहा उपाध्यक्ष व ६४ कार्यकारणी सदस्यांची निवड केली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akola bjp jumbo executive announced trying to maintain balance in the wake of elections ppd 88 ssb

First published on: 27-09-2023 at 11:20 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×