scorecardresearch

अकोला : राज्यातून उद्धवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी हद्दपार होणार – चंद्रशेखर बावनकुळे

‘घड्याळ’ सोडून माजी आमदार सिरस्कारांच्या हाती भाजपचा झेंडा

अकोला : राज्यातून उद्धवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी हद्दपार होणार – चंद्रशेखर बावनकुळे

राज्यात शिंदे व फडणवीसांच्या रुपाने गतिमान सरकार सत्तेत आले आहे. आता राज्यातून उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हद्दपार होईल, असा दावा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. उद्धवसेना संपल्यात जमा असून आगामी काळात काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धवसेनेतील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणा, असे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

अकोला शहरात शनिवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आ.बावनकुळे यांनी प्रथमच अकोला शहराचा दौरा केला. यावेळी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी राष्ट्रवादीची घड्याळ सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला. भाजपमध्ये असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला.

बुलढाण्याचा आगामी खासदार भाजपचाच! ; भाजप प्रदेशाध्यक्षांनी फुंकले निवडणुकांचे रणशिंग

पुढे बोलतांना आ.बावनकुळे म्हणाले, ‘‘राज्यात सत्ता परिवर्तन झाले. तीन चाकाचा ऑटो पंचर झाला होता. आता आलेले शिंदे व फडणवीस यांचे सरकार ‘बुलेट’सारखे आहे. ते खटारा ऑटोसारखे संथगतीने चालणारे नसून १०० च्या गतीने वेगवान पळणारे आहे. फडणवीस सरकारने दिलेले ओबीसी आरक्षण ‘मविआ’ सरकारने जाणून टाळले होते. आमचे सरकार येताच पुन्हा ओबीसींना आरक्षणाचा हक्क देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. शपथविधी होताच तत्काळ हालचाली करून ओबीसींना हक्काचे आरक्षण पुन्हा मिळवून दिले.’’

“देवेंद्र फडणवीस भाजपा-सेना युतीचे मुख्यमंत्री होणार,” चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे विधान

फडणवीस सरकारच्या कार्यकाळात साडेसात लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली. ‘मविआ’ सरकारने वीज तोडण्याचे काम केले, अशी टीका आ.बावनकुळे यांनी केली.

‘विदर्भ वैधानिक मंडळाचा प्रश्न रखडवत ठेवण्याचे पाप अजित पवारांचे’-

विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या पुनर्गठनाचा प्रश्न रखडवत ठेवण्याचे पाप अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. वैधानिक मंडळांना मुदतवाढ देण्यासाठी राज्यपालांद्वारे १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावण्याची सौदेबाजी अजित पवारांकडून करण्यात येत होती, असा आरोप बावनकुळे यांनी केला. विदर्भ वैधानिक विकास मंडळासाठी भाजपच्या आमदारांनी आवाज उठवला तर १२ आमदारांना निलंबित केले होते. शिंदे-फडणवीस यांचे सरकार येताच मंडळाचे पुनर्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाचा प्रश्न मार्गी लागला असून हे सरकार अनुशेष भरून काढेल, असा विश्वास आ.बावनकुळे यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Akola congress nationalist congress will be expelled from the state along with uddhav sena chandrasekhar bawankule msr

ताज्या बातम्या