अकोला : मोहाळी नदीवरील पूल ओलांडत असताना आजोबा आणि नातू दोघेही नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना अकोट तालुक्यातील तांदूळवाडी-सोनबर्डी पुलावर घडली. या घटनेत आजोबांचा मृत्यू झाला, तर नातवाचा शोध सुरू आहे. प्रभाकर प्रल्हाद लावणे आणि त्यांचा नातू आदित्य विनोद लावणे हे दोघेही मंगळवारी म्हैस घेऊन सोनबर्डी गावात गेले होते. दोघे परतीच्या मार्गावर असताना मोहाळी नदीवरील पूल ओलांडत होते. प्रभाकर यांचा नातू आदित्य हा नदीच्या प्रवाहात वाहून जात होता, त्याला वाचवण्यासाठी आजोबांनी प्रयत्न केले असता, तेही नदीच्या प्रवाहात वाहून गेले.

हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू
Pune, Hinjewadi IT Park, Leopard Sighted, cub Rescued, Sugarcane Field, forest department, marathi news,
पुणे : हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर नवजात बछड्या ताब्यात

हेही वाचा <<< मोदींवर टीका करताच नोकरी गमावली!; भंडाऱ्यातील पोलीस उपनिरीक्षकाची हकालपट्टी

ग्रामस्थांना माहिती मिळताच शोधकार्य सुरू केले. प्रभाकर लावणे यांचा मृतदेह आढळून आला, तर नातू आदित्यचा अद्याप शोध लागला नाही. त्याचा शोध सुरू आहे. घटनास्थळी महसूल व पोलीस अधिकारी दाखल झाले. पुराच्या पाण्यात आजोबा आणि नातू वाहून गेल्यामुळे तांदूळवाडी गावात शोककळा पसरली आहे. पुलाची उंची खूप कमी असल्याने थोड्या पावसात देखील त्यावरून पाणी वाहते. त्यामुळे या घटनेसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे.