डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात यंदापासून सेंद्रिय प्रमाणीकरण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी फ्रान्स येथील ‘एकोसर्ट (ई ॲन्ड एच )’ सोबत सामंजस्य करार केला आहे. या प्रकारचा देशातील पहिलाच अभ्यासक्रम असल्याची माहिती कृषी विद्यापीठाकडून देण्यात आली. विद्यापीठातील तज्ज्ञांसह ‘एकोसर्ट (ई ॲन्ड एच )’चे विषय तज्ज्ञ सेंद्रिय प्रमाणीकरणाच्या विषयाच्या अभ्यासक्रमाचे धडे देणार आहेत.

व्यावसायिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेतीच्या अभ्यासक्रम कुलगुरू डॉ. विलास भाले यांची संकल्पना आणि प्रयत्नातून सुरू करण्यात आला. ‘सेंद्रिय प्रमाणीकरण’ या विषयामध्ये २०२२-२३ वर्षामध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला असून कृषी अथवा कृषी संलग्न तथा विज्ञान विषयातील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना करता येणार आहे.

corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
mumbai university fake marksheet marathi news
कथित बनावट गुणपत्रिकेबाबत मुंबई विद्यापीठाकडून पोलीस तक्रार दाखल
CUET PG exam result announced by NTA pune
‘सीयूईटी-पीजी’ परीक्षेचा निकाल ‘एनटीए’कडून जाहीर, यंदा किती विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा?
Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग

पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा –

पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे. कौशल्य आधारित शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमामुळे या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. या अभ्यासक्रमातून सेंद्रिय शेती प्रमाणीकरण क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती होणार आहे. या अभ्यासक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले.