डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात यंदापासून सेंद्रिय प्रमाणीकरण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी फ्रान्स येथील ‘एकोसर्ट (ई ॲन्ड एच )’ सोबत सामंजस्य करार केला आहे. या प्रकारचा देशातील पहिलाच अभ्यासक्रम असल्याची माहिती कृषी विद्यापीठाकडून देण्यात आली. विद्यापीठातील तज्ज्ञांसह ‘एकोसर्ट (ई ॲन्ड एच )’चे विषय तज्ज्ञ सेंद्रिय प्रमाणीकरणाच्या विषयाच्या अभ्यासक्रमाचे धडे देणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्यावसायिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेतीच्या अभ्यासक्रम कुलगुरू डॉ. विलास भाले यांची संकल्पना आणि प्रयत्नातून सुरू करण्यात आला. ‘सेंद्रिय प्रमाणीकरण’ या विषयामध्ये २०२२-२३ वर्षामध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू केला असून कृषी अथवा कृषी संलग्न तथा विज्ञान विषयातील पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना करता येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akola dr panjabrao deshmukh agricultural university will conduct the first organic certification course in the country msr
First published on: 19-08-2022 at 12:11 IST